अखेर वर्गणी काढून डिझेल शवदाहिनी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:55 AM2017-09-08T00:55:41+5:302017-09-08T00:55:49+5:30
अमरधाममधील डिझेल शवदाहिनीची निगा राखणे महापालिकेला शक्य होत नसूून देखभाल, दुरुस्तीचा ठेका देऊनही संबंधित कंपनीने पाठ फिरवल्याने अखेरीस आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाºयांनीच वर्गणी काढून ही शवदाहिनी कार्यान्वित केली.
नाशिक : अमरधाममधील डिझेल शवदाहिनीची निगा राखणे महापालिकेला शक्य होत नसूून देखभाल, दुरुस्तीचा ठेका देऊनही संबंधित कंपनीने पाठ फिरवल्याने अखेरीस आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाºयांनीच वर्गणी काढून ही शवदाहिनी कार्यान्वित केली.
महापालिकेची केवळ नाशिक अमरधाममध्ये एकच डिझेल शवदाहिनी असून, तिचीही दुरुस्ती शक्य होत नसेल तर स्मार्ट सिटी अंतर्गत आता काही विद्युत शवदाहिन्या सुरू होणार असून त्या तरी कार्यान्वित ठेवणे पालिकेला शक्य होणार आहे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात लाकडे लागत असल्यामुळे वृक्षतोड होते. पर्यावरणाचा ºहास टाळण्यासाठी अनेक मोठ्या शहरांमध्ये अशाप्रकारच्या डिझेल आणि विद्युत शवदाहिनी आहेत. महापालिकेने सुमारे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी ही डिझेल शवदाहिनी नाशिक अमरधाममध्ये सुरू केली. मात्र सुरुवातील काही वर्ष ती बंदच होती. मात्र, नंतर नागरिकांमध्ये जागृकता झाल्यावर त्याचा वापर सुरू झाला. या शवदाहिनीच्या देखभाल, दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज असली तरी तसे होत नसल्याने पाईप किंवा अन्य साधने नादुरुस्त असल्याने अनेकदा ती बंद ठेवावी लागते. अशावेळी एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर डिझेल शवदाहिनीत अंत्यसंस्काराची तयारी त्यांच्या कुटुंबीयांनी केली तरी शवदाहिनी बंद असते. ती दुरुस्त करण्यासाठी ठाणे येथील ठेकेदार कंपनीला कळविण्यात येते. मग त्यांच्या सोयीने दुरुस्ती होते. गेल्या महिन्यात दहा दिवसांसाठी शवदाहिनी बंद करण्यात आली होती. परंतु ठेकेदाराच्या कर्मचाºयांनी पूर्ण दुरुस्ती केलीच नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावरच कर्मचाºयांनी तात्पुरती रक्कम जमा करून गेल्या २९ आॅगस्टला ही शवदाहिनी पुन्हा कार्यान्वित केली आहे.