अखेर पश्चिम विभागात सुरू झाली दोन लसीकरण केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:12 AM2021-07-01T04:12:01+5:302021-07-01T04:12:01+5:30
जानेवारी महिन्यापासून लसीकरण सुरू करण्यात आले. सुरुवातीला कोरोना योद्धे म्हणून वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना संधी देण्यात आली. त्यानंतर फ्रंटलाइन ...
जानेवारी महिन्यापासून लसीकरण सुरू करण्यात आले. सुरुवातीला कोरोना योद्धे म्हणून वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना संधी देण्यात आली. त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण सुरू झाले. त्यावेळी लसीकरण केंद्रे मर्यादित होती. मात्र, ४५ वर्षांपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यास प्रारंभ झाल्यानंतर अगदी मे महिन्यात २८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांनादेखील लसीकरण करण्यास प्रारंभ झाला; परंतु नंतर पश्चिम विभाग वगळता सर्वच विभागांत दोन ते तीन रुग्णालयांत लसीकरण करण्यात येत हेाते. त्यामुळे पश्चिम विभागातील नागरिकांना लस घेण्यासाठी गंगापूर गाव, पंचवटी, सिडको या भागांत धावपळ करावी लागत हाेती.
स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी पश्चिम विभागात लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी आयुक्तांकडे केली होती. अखेरीस आयुक्त कैलास जाधव यांनी बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र आणि महात्मानगर येथील ज्येष्ठ नागरिक भवन येथे लसीकरण सुरू करण्यात आले आले. त्यामुळे पश्चिम विभागातील नागरिकांची मोठी साेय झाली आहे.
-----------
फॉलोअप लोगो करावा.