अखेरीस वडाळा, मुलतानपुरा रूग्णालय सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:04 AM2020-09-25T00:04:46+5:302020-09-25T01:26:17+5:30
नाशिक- महापालिकेने आपल्या रूग्णालयात खाटांची व्यवस्था केली मात्र, ते सुरू करण्याऐवजी नवनविन कोविड सेंटर सुरू केले जात आहे.या लोकमतच्या वृत्ताची दखल मुलतानपुरा येथे दवाखाना आणि वडाळा भागातील रूग्णालये सुरू करण्याचे निर्देश स्थायी समितीच्या वतीने गुरूवारी (दि.२४) देण्यात आले आहेत.
नाशिक- महापालिकेने आपल्या रूग्णालयात खाटांची व्यवस्था केली मात्र, ते सुरू करण्याऐवजी नवनविन कोविड सेंटर सुरू केले जात आहे.या लोकमतच्या वृत्ताची दखल मुलतानपुरा येथे दवाखाना आणि वडाळा भागातील रूग्णालये सुरू
करण्याचे निर्देश स्थायी समितीच्या वतीने गुरूवारी (दि.२४) देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या वतीने शहरात नवनविन रूग्णालयाांना परवानगी दिली जात आहे. परंतु बेड मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच महापालिकेने तयार केलेल्या डॅश बोर्डवर गंगापूर गाव येथील रूग्णालय, तपोवन कोविड सेंटर,
विल्होळी येथे खत प्रकल्पाच्या आवारातील प्रशिक्षण केंद्र येथे देखील कोविड सेंटर दाखवण्यात आले आहे. मात्र, ते अॅक्टीव नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यातच महापालिकेने मध्यंतरी वडाळा येथे रूग्णालय सुरू
करण्याची घोषणा केली मात्र स्टाफ नसल्याने सारेच काम अडून आहे. मुलतानपुरा येथे देखील महापालिकेचे रूग्णालय वापराविना पडून आहे. एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे संभाजी राजे स्टेडीयम येथे नवीन कोविड सेंटर
तयार करून तेथे दोनशे खाटांचे बेड तयार करण्याचे घाटत आहे. याबाबत लोकमतने वृत्त दिले होते. गुरूवारी (दि.२४) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले. वर्षा भालेराव यांनी पुन्हा मनपाचे रूग्णालय
इनअॅक्टीव्ह दाखवले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्याबरोबरच सुप्रिया खोडे यांनी वडाळा रूग्णालय तर समीना मेमन यांनी मुलतानपुरा येथील रूग्णालय सुरू करण्याची मागणी केली.त्यावर वडाळा रूग्णालयात
डॉक्टर्स नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले तर मुलतानपुरा मनुष्यबळाअभावी तुर्तास रूग्णालय सुरू करणे शक्य नाही. परंतु किमान दवाखाना तातडीने सुरू करण्याचे ठरविण्यात आले.