रोजच मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पिके पाण्याखालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:26 AM2019-09-29T00:26:19+5:302019-09-29T00:26:48+5:30

नाशिक तालुका पूर्व भागात गेल्या आठवडाभरापासून रोज सायंकाळी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ढग फुटीसारख्या या पावसामुळे शेतात सर्वत्र पाणी साचल्याने भाजीपाला पिके सडू लागली आहेत.

 Every day, the monsoon rains are raining | रोजच मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पिके पाण्याखालीच

रोजच मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पिके पाण्याखालीच

Next

एकलहरे : नाशिक तालुका पूर्व भागात गेल्या आठवडाभरापासून रोज सायंकाळी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ढग फुटीसारख्या या पावसामुळे शेतात सर्वत्र पाणी साचल्याने भाजीपाला पिके सडू लागली आहेत. मेथी, शेपू, पालक पिवळी पडून सडू लागली आहेत. त्यामुळे ऐन पितृ पक्षात भाजीपाल्याचे भाव गगणाला भिडले आहेत.
नाशिक तालुका पूर्व भागातील काही ठिकाणी टमाट्याची खुडणी सुरू आहे. चिखलातून व पाणी साचलेल्या सऱ्यांमधून मजूर टमाटे खुडून त्याच्या प्रतवारीनुसार विभागणी करीत आहेत. मजुरांना १६ रु पये जाळीप्रमाणे टमाटे खुडण्याची मजुरी दिली जात आहे. पावसामुळे टमाट्याचे भाव उतरले असून, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे २०० रु पये जाळी प्रमाणे भाव मिळतो. यापूर्वी गेल्या आठवड्यात सुमारे ४०० रु पये जाळीचा भाव मिळत होता. मात्र संततधार पावसामुळे टमाट्याचे दर कमी झाल्याचे सामनगावचे शेतकरी तानाजी ढोकणे सांगतात.
काही ठिकाणी फ्लॉवरची निंदणी शेतकरी सहकुटुंब करीत आहेत. सध्या सुरू असलेली पावसाची रिपरिप व मजुरांची वानवा असल्यामुळे शेतकऱ्यांना घरच्या घरीच सर्व कामे उरकावी लागत आहेत. एकलहरे गाव, हिंगणवेढे परिसरात द्राक्षबागांची आॅक्टोबर छाटणीला सुरु वात झाली आहे.
सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, हिंगणवेढे परिसरात पावसाचे पाणी शेतातून उफाळून आल्याने अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली आहेत ही पिके चिखल व पाण्यामुळे सडून जाण्याची भीती हिंगणवेढ्याचे शेतकरी साहेबराव धात्रक यांनी व्यक्त केली आहे.
जाखोरी, मोहगाव, चांदगिरी, कोटमगाव शिवारात मूग व भुईमूग ही पिके जोमात आहेत. अनेक ठिकाणी शेतकºयांनी काकडीची लागवड केली आहे. औषधे फवारणी करून पिकांवरील किडीचे नियंत्रण शेतकरी करीत आहेत. काकडीला पिवळ्याधमक फुलांचा बहर आला आहे. आणखी पंधरा दिवसांनी लुसलुसीत काकडी खुडायला येईल, असे जाखोरीचे शेतकरी भाऊसाहेब कळमकर यांनी सांगितले.
भरपूर पावसामुळे उसाचे पीक व द्राक्षाच्या बागा जोमाने बहरू लागल्याचे दिसते. एकलहरे परिसरातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, बाभळेश्वर, मोहगाव, चांदगिरी, जाखोरी, हिंगणवेढा, कालवी, गंगापाडळी, लाखलगाव, पिंप्री, ओढा, शीलापूर, माडसांगवी, गंगावाडी, या परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने नद्या, नाले, विहिरी, तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाला शेंगा आल्या आहेत. या शेंगातून दाणे भरण्याची प्रक्रि या सुरू आहे. सुमारे दीड महिन्यानंतर सोयाबीन पीक काढणीस येईल.

Web Title:  Every day, the monsoon rains are raining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.