इगतपुरी तालुक्यात प्रत्येक कुटुंबाची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 09:16 PM2020-09-18T21:16:10+5:302020-09-19T01:17:15+5:30

घोटी : जनतेच्या मनातील भीती कमी करणे, करोनावर नियंत्रण मिळविणे या हेतूने ’माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहीमेचा शुभारंभ इगतपुरी पंचायत समिती येथे करण्यात आला. तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Every family in Igatpuri taluka will be inspected | इगतपुरी तालुक्यात प्रत्येक कुटुंबाची होणार तपासणी

इगतपुरी तालुक्यात प्रत्येक कुटुंबाची होणार तपासणी

Next
ठळक मुद्देप्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात येणार

घोटी : जनतेच्या मनातील भीती कमी करणे, करोनावर नियंत्रण मिळविणे या हेतूने ’माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहीमेचा शुभारंभ इगतपुरी पंचायत समिती येथे करण्यात आला. तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, जि. प. सदस्या नयना गावित, पं. स. सभापती जया कचरे, प्रभारी सभापती जिजाबाई नाठे आदींची प्रमुख उपस्थिती होती. रघुनाथ तोकडे, पं. स. सदस्य विठल लंगडे, भगवान आडोळे, गटविकास अधिकारी किरण जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम बी देशमुख यांनी मार्गदर्शन केले. पं. स. सदस्य अण्णा पवार, सोमनाथ जोशी, राजाभाऊ नाठे, कुलदीप चौधरी, रंगनाथ कचरे आदी उपस्थित होते.
(फोटो : 18घोटी1)

 

Web Title: Every family in Igatpuri taluka will be inspected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.