प्रत्येकाने परमात्म्याचा ध्यास घ्यावा : साध्वी सुशीलकुवरजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 01:06 AM2018-09-11T01:06:57+5:302018-09-11T01:07:47+5:30
पर्वाधिराज पर्यूषण पर्वाचे मंगलमय आगमन झाले आहे. ५व्या दिवसाचा सूर्य उदित झाला आहे. दान, शील, तप यावर आकृष्ट आराधना केली पाहिजे. प्रत्येकाने परमात्म्याचा ध्यास धरावा, असे आवाहन जैन साध्वी सुशीलकुवरजी म.सा. यांनी केले.
नाशिक : पर्वाधिराज पर्यूषण पर्वाचे मंगलमय आगमन झाले आहे. ५व्या दिवसाचा सूर्य उदित झाला आहे. दान, शील, तप यावर आकृष्ट आराधना केली पाहिजे. प्रत्येकाने परमात्म्याचा ध्यास धरावा, असे आवाहन जैन साध्वी सुशीलकुवरजी म.सा. यांनी केले. चोपडा लॉन्स येथे सुरू असलेल्या पर्यूषण पर्वाच्या विशेष व्याख्यानात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, भरपूर आराधना करून देवाला आपण चरणी नतमस्तक असल्याचे सांगावे. अनुमोदनकरुन तीर्थंकर गोत्र उपार्जन केले पाहिजे. आपल्याला परमात्म्यासारखे काम करायचे आहे हे आपल्या जीवनाचे ध्येय असले पाहिजे. महावीरांच्या संदेशाने अनेकांच्या जीवनात परिवर्तन केले आहे. दान व मानवाची महिमा त्यांनी एका गोष्टीद्वारे स्पष्ट केली. त्यांनी सांगितले, एक दाम्पत्य घरी येणाऱ्या प्रत्येकाला चहा, नाष्टा, जेवण देत असे. एका रात्री चोरी करायला चोर आले होते. जाग आल्यानंतर घरातील स्त्रीने त्यांना ‘जेवल्याशिवाय जाऊ नका’ असा आग्रह केला. जेवल्यावर ते चोर खूप आनंदीत झाले. गरिबी व घरातील सदस्यांच्या गरजा भागविण्यासाठी आपण चोरी करत असल्याचे त्यांनी कबूल केले. आदरतिथ्य, दिलेला मान पाहून त्यांचे मन परिवर्तन झाले. चोपडा लॉन्स येथे सुरू असलेल्या पर्यूषण पर्वाच्या विशेष व्याख्यानात जैन साध्वी सुशीलकुवरजी म.सा. यांनी प्रवचनामध्ये भगवान महावीरांच्या जीवनातील तसेच विविध संदेशाची उदाहरणे दिली.