उमेदवारीसाठी सर्वांनीच ठेवले देव पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:35 AM2017-08-03T00:35:45+5:302017-08-03T00:44:17+5:30

नाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षणसंस्थेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक श्रीराम शेटे यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरल्याने सत्ताधाºयांनी ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यासाठी बुधवारी (दि.२) दिवसभर पंडित कॉलनीतील एका बॅँकेत प्रगती पॅनलच्या निवड मंडळातील सदस्यांच्या मॅरेथॉन बैठका झाल्याचे समजते. अपात्र ठरविण्यात आलेल्या सर्वच उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतल्याचे वृत्त आहे.

Everyone has kept for the candidacy | उमेदवारीसाठी सर्वांनीच ठेवले देव पाण्यात

उमेदवारीसाठी सर्वांनीच ठेवले देव पाण्यात

Next

नाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षणसंस्थेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक श्रीराम शेटे यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरल्याने सत्ताधाºयांनी ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यासाठी बुधवारी (दि.२) दिवसभर पंडित कॉलनीतील एका बॅँकेत प्रगती पॅनलच्या निवड मंडळातील सदस्यांच्या मॅरेथॉन बैठका झाल्याचे समजते. अपात्र ठरविण्यात आलेल्या सर्वच उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, विरोधी समाज विकास पॅनलने तालुकानिहाय बैठकांचा जोर सुरूच ठेवत बुधवारी मालेगाव व बागलाण येथे सहविचार सभा घेत सत्ताधारी पॅनलच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
नांदगावमधून प्रगती पॅनलसाठी इच्छुक असलेल्या दहा जणांच्या गटाने सरचिटणीस नीलिमा पवार यांच्यासमोर विद्यमान संचालक दिलीप पाटील यांच्याऐवजी कोणा एकाला उमेदवारी देण्याचा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच नीलिमा पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नांदगावमधून सभासदांची सर्वाधिक मागणी विद्यमान संचालक दिलीप पाटील यांना असल्याचे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर या दहा जणांच्या गटाला महत्त्व प्राप्त झाले आहे. दुसरीकडे कळवणमधून इच्छुक असलेले विद्यमान संचालक रवींद्र देवरे यांनी उमेदवारी मिळाली तरच उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला असून, उमेदवारी न मिळाल्यास शांत राहण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. बुधवारी पंडित कॉलनीतील एका बॅँकेत सत्ताधारी प्रगती पॅनलच्या निवड समितीतील सर्व सदस्यांची दिवसभर उमेदवारीबाबत खलबते चालली. यावेळी माजीमंत्री विनायक पाटील, सरचिटणीस नीलिमा पवार, रामचंद्र बापू पाटील, अ‍ॅड. शशिकांत पवार, श्रीराम शेटे आदींसह निवड मंडळाचे सदस्य उपस्थित होते.सभासद नाही : पाटील
दिंडोरी तालुक्यातून प्रगती पॅनलकडून इच्छुक असलेले कृउबा सभापती दत्तात्रय पाटील यांनी आपण मविप्र व्यतिरिक्त कोणत्याही संस्थेचा सभासद नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आपल्या जन्मासाठी आई-वडिलांनी करंजी (दिंडोरी) येथे नवस केल्यानेच तेथे शिक्षणसंस्था उभारून आपण त्या संस्थेला मदत करीत आलो आहोत. आपण या संस्थेचे सभासद अथवा संस्थापक नाही, असे दइात्रय पाटील यांचे म्हणणे आहे.न्यायालयात धाव
लवादाने उमेदवारी अर्ज बाद ठरविलेले सर्वच उमेदवार मुंबई उच्च न्यायालयात गेल्याचे समजते. त्यात विद्यमान संचालक श्रीराम शेटे, नानासाहेब दाते, नंदा सोनवणे व गुलाबराव भामरे या सर्वच उमेदवारांनी लवादाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली. याबाबत गुरुवारी (दि.३) सुनावणी होणार असल्याचे कळते.

Web Title: Everyone has kept for the candidacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.