प्रत्येकाने कलेचा आस्वाद घ्यावा : संजय दराडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:10 AM2019-01-28T01:10:36+5:302019-01-28T01:10:55+5:30
प्रत्येक कलेचा आस्वाद घ्यायचा ठरवले तर आयुष्य कमी पडेल असा विविधतेने नटलेला आपला भारत देश आहे. धकाधकीच्या व ट्रेसफुल आयुष्यात ऋतुरंग उत्सवासारखे कार्यक्रमात सहभागी झाले तर माणूस तणावमुक्त होईल, असे प्रतिपादन ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केले.
नाशिकरोड : प्रत्येक कलेचा आस्वाद घ्यायचा ठरवले तर आयुष्य कमी पडेल असा विविधतेने नटलेला आपला भारत देश आहे. धकाधकीच्या व ट्रेसफुल आयुष्यात ऋतुरंग उत्सवासारखे कार्यक्रमात सहभागी झाले तर माणूस तणावमुक्त होईल, असे प्रतिपादन ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केले.
दत्तमंदिर बसथांब्यामागील ऋतुरंग भवनमध्ये तीन दिवसीय ऋतुरंग कला व सांस्कृतिक उत्सवाचे शनिवारी सायंकाळी झालेल्या उद्घाटनप्रसंगी दराडे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्टÑ पोलीस अकॅडमीचे ट्रेनी विभागाचे सहसंचालक डॉ. जालिंदर सुपेकर, रोहिणी दराडे, उद्योजक श्रीकांत करवा, बिझनेस बॅँकेचे अध्यक्ष पुरूषोत्तम फुलसुंदर, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे विजय चोरडिया, वसंतराव नगरकर, विजय संकलेचा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून व दीपप्रज्वलन करून ऋतुरंग उत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी सिन्नरच्या वडांगळी येथील विद्यार्थिनी मोहिनी भुसे हिने संबळ वादनाने उपस्थिताना मंत्रमुग्ध करून सांस्कृतिक उत्सवाचा शुभारंभ केला.
ऋतुरंग उत्सवानिमित्त छायाचित्र, विविध शिल्प, मिनीएचर लाइव्ह गार्डन, चित्रकला आदींचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सूत्रसंचालन तन्वी अमित यांनी केले. यावेळी राजा पत्की, मोहन लाहोटी, प्रकाश पाटील, अशोक तापडिया, रवि पारुंडेकर, रमेश पंचभाई, डॉ. पी. एफ. ठोळे, भागवत माळी, सुरेश गवंडर, सुरेश टर्ले, रमेश जाधव, अरुण पाटील, सुभाष पाटील, प्रभाष जोशी आदी उपस्थित होते.
मराठी गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध
४ऋतुरंग उत्सवाच्या पहिल्या कार्यक्रमात फेदरटच स्टुडिओतर्फे मराठी संगीत क्षेत्रातील जन्मशताब्दी वर्ष असणाऱ्या दिग्गज प्रतिभावंतांना मानवंदना देण्यासाठी ‘पंचरत्न’ हा जयेश आपटे यांनी दिग्दर्शन केलेला कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये ग. दि. माडगूळकर, सी. रामचंद्र, सुधीर फडके, राम कदम, पु.ल. देशपांडे लिखित विविध गीतगायिका रसिका नातू, सुवर्णा क्षीरसागर, विवेक केळकर यांनी सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. हार्मोनियमवर प्रमोद पवार, की-बोर्डवर कृपा परदेशी, तबला-ढोलकी शुभम जोशी यांनी साथसंगत केली. निवेदन धनेश जोशी यांनी केले.