दोन हजाराच्या नोटेचे सर्वांनाच अप्रूप

By admin | Published: November 11, 2016 12:26 AM2016-11-11T00:26:41+5:302016-11-11T00:24:55+5:30

वितरण सुरू : मात्र वस्तू खरेदीत अडचणी

Everyone's notes of two thousand notes | दोन हजाराच्या नोटेचे सर्वांनाच अप्रूप

दोन हजाराच्या नोटेचे सर्वांनाच अप्रूप

Next

नाशिक : रद्दबातल ठरविलेल्या पाचशे-हजारच्या नोटांच्या बदल्यात नागरिकांच्या हाती नव्यानेच बाजारात आलेल्या दोन हजारांच्या गुलाबी रंगाच्या नोटा पडल्या आणि अनेकांना दोन हजाराच्या नोटेचे अपू्रप वाटले. मात्र, सदर नोटही बाजारपेठेत घेण्यास आणि त्याबदल्यात सुटे पैसे देण्यास व्यावसायिकांनी उत्स्फूर्तता न दाखविल्याने अप्रूप काही वेळेपुरताच राहिले. त्यामुळे अनेकांची पैसे असूनही वस्तू खरेदीत अडचण झाली.मोदी सरकारने पाचशे-हजारच्या नोटा चलनातून बाद ठरविल्यानंतर आपल्याजवळील शिल्लक पाचशे-हजारच्या नोटा बदली करण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच विविध बॅँकांमध्ये गर्दी केली. बॅँकांबाहेर अक्षरश: रांगा लागल्या. काही खातेदारांनी आपल्या खात्यात पाचशे-हजारच्या नोटा जमा केल्या तर काही खातेदारांसह नागरिकांनी पाचशे-हजारच्या नोटा बदलून घेण्यासाठी बॅँकांमध्ये गर्दी केली. यावेळी बॅँकांकडून अशा खातेदारांना प्रत्येकी चार हजार रुपयांपर्यंतची रक्कम अदा केली जात होती. त्यातही सरकारने नव्यानेच बाजारात आणलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांचा समावेश होता. प्रत्येकाच्या हाती नवीन दोन हजाराच्या नोटा दिसून येत होत्या. गुलाबी रंगात महात्मा गांधी यांची बरोबर मधोमध छबी असलेल्या या नोटांचे अनेकांना मोठे अप्रूप वाटले. (प्रतिनिधी)

Web Title: Everyone's notes of two thousand notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.