कलशपूजनापासून सत्यनारायणापर्यंत सर्व काही ऑनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:11 AM2021-06-24T04:11:57+5:302021-06-24T04:11:57+5:30

कोरोनाकाळात सर्वच प्रकराच्या व्यवहारांवर मर्यादा आल्या होत्या. देऊळ बंद तर अजूनही कायम आहे. सर्व प्रकाराच्या सणावारांवर बंदी कायम आहे. ...

Everything from Kalash Puja to Satyanarayana is online | कलशपूजनापासून सत्यनारायणापर्यंत सर्व काही ऑनलाइन

कलशपूजनापासून सत्यनारायणापर्यंत सर्व काही ऑनलाइन

Next

कोरोनाकाळात सर्वच प्रकराच्या व्यवहारांवर मर्यादा आल्या होत्या. देऊळ बंद तर अजूनही कायम आहे. सर्व प्रकाराच्या सणावारांवर बंदी कायम आहे. राज्यात काही प्रमाणात निर्बंध शिथिल झाले तसे आता मंदिरे बंद असले तरी यज्ञ याग आणि अन्य विधी मात्र बंद आहेत. व्यक्तिगत पातळीवर मात्र विधी सुरू झाले आहेत. परंतु त्यानंतरही नागरिकांमध्ये काेरोनाचे भय असल्याने अजूनही विधी पाहिजे त्या प्रमाणात होत नाहीत. अजूनही श्राद्ध विधीपासून तेराव्यापर्यंत ऑनलाइन विधी होत आहेत. निर्बंध काळात व्यक्तिगत पातळीवर लग्नसोहळे होत असल्याने त्यावेळी विवाहाआधी गृहमुख, लग्नसोहळे आणि नंतर सत्यनारायण पूजा करावी लागते. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी वास्तुशांतीचा मोठा कार्यक्रम करता येत नसल्याने कलशपूजन करण्यात येते, तेदेखील ऑनलाइन पद्धतीने केले जात आहे.

अर्थात, नाशिकमधील पुरोहितांनी दिलेल्या माहितीनुसार आता बऱ्यापैकी निर्बंध शिथिल झाल्याने विधी होत आहेत. मात्र, काही प्रमाणातच ऑनलाइन विधी होत आहेत.

कोट...

निर्बंध शिथिल झाल्याने बऱ्यापैकी धार्मिक विधी होत आहेत. अर्थात, नियमांचे पालन करूनच सर्व विधी हाेतात. आता बहुतांश विधी प्रत्यक्ष होत आहेत. एका चौरगांवरील पूजा साहित्याचे विधी सहजपणे ऑनलाइन पद्धतीने होतात. अन्य यज्ञ याग मात्र बंद आहेत.

- अमित गायधनी, पुरोहित

कोट..

सध्या बऱ्यापैकी विधी होत आहेत. रामकुंडावरदेखील विधी होत आहेत. त्यासाठी यजमानांना मर्यादित संख्येनेच या असे विधी करणारे पुरोहित आगाऊ सूचना देतात. त्यामुळे अडचण येत नाही. परंतु सर्वच विधीच्या ठिकाणी आरोग्य नियमांचे पालन केले जाते.

- सुयोग देव, पुरोहित

इन्फो...

सध्या कोणतेही विधी होत आहेत ऑनलाइन?

कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने आता बऱ्यापैकी विधी होऊ लागले आहेत. मात्र, अजूनही कलशपूजन, सत्यनारायण हे विधी ऑनलाइन पद्धतीने होतात. त्यासाठी झूम, गुगल मिट तसेच अन्य ॲपचा वापर केला जातो.

इन्फो..

पूजेला गेले तरी मास्क

- पूजेला जाताना पुरोहित वर्ग मोठ्या प्रमाणात काळजी घेतो. हॅण्ड सॅनिटायझर, मास्क या साधनांचा प्रामुख्याने वापर केला जातो.

- पूजा विधीला जाताना अनेक पुरोहित अगोदरच यजमानांना कमीत कमी व्यक्ती पूजेच्या वेळी असाव्यात, अशी सक्ती सूचना केली जाते.

- कोणतीही पूजा करताना मास्क काढला जात नाही तसेच सुरक्षित अंतराचे पालनदेखील केले जाते.

Web Title: Everything from Kalash Puja to Satyanarayana is online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.