नाशिक शहरात ठिकठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:25 PM2019-10-21T12:25:10+5:302019-10-21T12:27:58+5:30

नाशिक- शहरात मतदानाला सकाळी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असताना अनेक ठिकाणी मतदान केंद्रातील इव्हीएम बंद पडण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी बॅटरी चार्जिंगची समस्या होती. त्यामुळे मतदारांना ताटकळावे लागले. अर्थात, निवडणूक शाखेने तत्काळ दुरूस्ती किंवा पर्यायी यंत्रे पाठविल्याने काही वेळातच मतदान सुरळीत झाले.

EVM breakdown in Nashik city | नाशिक शहरात ठिकठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या घटना

नाशिक शहरात ठिकठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या घटना

Next
ठळक मुद्देकुठे यंत्र तर कुठे बॅटरीची समस्यामतदारांचा काही काळ खोळंबा

नाशिक- शहरात मतदानाला सकाळी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असताना अनेक ठिकाणी मतदान केंद्रातील इव्हीएम बंद पडण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी बॅटरी चार्जिंगची समस्या होती. त्यामुळे मतदारांना ताटकळावे लागले. अर्थात, निवडणूक शाखेने तत्काळ दुरूस्ती किंवा पर्यायी यंत्रे पाठविल्याने काही वेळातच मतदान सुरळीत झाले.

नाशिक शहरातील नाशिक मध्य मतदार संघात अटलबिहारी वाजयपेयी मनपा शाळेत सकाळीच मतदार रांगेत असतनाच ईव्हीएम बंद पडल्याने खोळंबा झाला. काही वेळाने ते सुरू झाले. नाशिक पूर्व मतदार संघात पंचवटीतील फुले नगर येथील मनपा शाळेत बॅटरी खराब झाल्याने ईव्हीएम बंद पडले. त्यानंतर ते सुरळीत झाले. पंचवटीतीच मखमलाबाद नाका येथील उदय कॉलनी येथे एका मतदाराने मतदान केल्यानंतर ईव्हीएम बंद पडले. तपासणी केल्यानंतर बॅटरीत बिघाड झाले असल्याचे निदर्शनास आले. बॅटरी बदलल्यानंतर ते सुरळीत झाले. नाशिक पश्चिम मतदार संघातील कामटवाडे येथील विखे पाटील शाळेत मतदान केंद्र क्रमांक ३१६ मध्ये सकाळी आठ वाजता ईव्हीएम बंद पडले. त्यानंतर ते बदलण्यात आले त्यामुळे दहा मिनीटांनी मतदान सुरळीत झाले. त्यानंतर त्याच्या शेजारीत केंद्र क्रमांक ३१७ मध्ये देखील ईव्हीएम बंद पडले. परंतु पर्यायी यंत्र नसल्याने ते मागविण्यात आले. त्यामुळे पाऊण तासांनी मतदान सुरू झाले.

देवळाली मतदार संघात एकलहरे येथील ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने देखील मतदारांची अडचण झाली. परंतु काही वेळात दुसरे इव्हीएम लावण्यात आले. त्यानंतर मतदान सुरळीत झाले. नाशिकरोड येथील शिखरेवाडी केंद्र क्रमांक २४८ मध्ये देखील यंत्रातील बिघाडामुळे अडचण निर्माण झाली. त्यामुळे निवडणूक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ईव्हीएम दुरूस्तीनंतर मतदान सुरळीत झाले.

Web Title: EVM breakdown in Nashik city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.