ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रांची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 01:47 AM2019-08-15T01:47:16+5:302019-08-15T01:47:41+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्याने निवडणुकीची जोरदार तयारी चालविली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार विधानसभा निवडणूक पारदर्शक आणि विनातक्रार होण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम, मतदान कर्मचाऱ्यांची तत्परता या जोरावर नाशिक जिल्ह्याने निवडणुकीच्या कामात आघाडी घेतली आहे.

 EVM, VVPAT device verification | ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रांची पडताळणी

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रांची पडताळणी

Next

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्याने निवडणुकीची जोरदार तयारी चालविली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार विधानसभानिवडणूक पारदर्शक आणि विनातक्रार होण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम, मतदान कर्मचाऱ्यांची तत्परता या जोरावर नाशिक जिल्ह्याने निवडणुकीच्या कामात आघाडी घेतली आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याला प्राप्त झालेल्या यंत्रणांची पडताळणी अंबड येथील सेंट्रल वेअरहाउस येथे सुरू असल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून नाशिक जिल्हा निवडणूक शाखेची युद्धपातळीवर तयारी सुरू असून, मतदार याद्या आणि निवडणूक कामांच्या बाबतीत काटेकोर नियोजन केले जात आहे. याच अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाकडे संभाव्य मतदान यंत्रांची मागणी नोंदविण्यात आली होती. या मागणीनुसार दहा हजार बॅलेट युनिट, सहा हजार व्हीव्हीपॅट व सहा हजार कंट्रोल युनिटची निवडणुकीसाठी आवश्यकता असणार आहे. या यंत्रणांसाठी लागणाºया पूरक साहित्यांची जमवाजमवदेखील करण्यात आलेली आहे.
सर्वसामान्यांसह विद्यार्थ्यांनाही बरोबर घेऊन मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमा, मतदान कर्मचाऱ्यांची कामे, मतदान केंद्रांची परिस्थिती, मतदार याद्यांची पडताळणी, दुरुस्ती आणि आता राजकीय पक्षांना प्रारूप मतदारयाद्या पोहोचविण्याची कामे करण्यात आलेली आहे.
आता अंतिम मतदारयादी जाहीर होणार असली तरी मतांचा टक्का वाढविण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणे आणि तेथील ग्रामस्थ आणि नागरिकांसाठी अनेकविध उपक्रम राबविण्यात
आले.
कामांचे नियोजन सुरू
निवडणुकीतील तयारीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या विविध कामांमुळे सर्व कामे नियोजितपणे सुरू असल्याने नाशिक जिल्हा निवडणुकीसाठी सज्ज झाल्याचे दिसून येते. सध्या अंबड येथील सेंट्रल वेअरहाउस येथे सदर मशीन्स ठेवण्यात आली असून, गेल्या दोन दिवसांपासून अधिकाºयांच्या मार्गदर्शखाली यंत्रे हाताळण्याबाबतचे प्रशिक्षण कर्मचाºयांना देण्यात येत असल्याचे समजते.

Web Title:  EVM, VVPAT device verification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.