निफाडला रंगला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 02:10 PM2019-02-11T14:10:29+5:302019-02-11T14:10:45+5:30
निफाड : माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील स्नेह अधिक वृद्धिंगत व्हावा त्याचबरोबर गेल्या ३१ वर्षांच्या शालेय जीवनातील आपल्या गोड कडू आठवणीना उजाळा देण्यासाठी तसेच शाळेविषयी असलेली आपली आपुलकी, प्रेम ,जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी सन १९८८ च्या दहावी वर्गातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि तत्कालीन सर्व शिक्षकांनी हा स्नेहमेळावा घडवून आणला.
निफाड : माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील स्नेह अधिक वृद्धिंगत व्हावा त्याचबरोबर गेल्या ३१ वर्षांच्या शालेय जीवनातील आपल्या गोड कडू आठवणीना उजाळा देण्यासाठी तसेच शाळेविषयी असलेली आपली आपुलकी, प्रेम ,जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी सन १९८८ च्या दहावी वर्गातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि तत्कालीन सर्व शिक्षकांनी हा स्नेहमेळावा घडवून आणला. दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित निफाड इंग्लिश स्कूल येथे या शाळेमध्ये दहावीच्या १९८८ च्या बॅचच्या म्हणजेच ३१ वर्षानंतर माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेहमेळावा ३१ वर्षानंतर आयोजित करण्यात आला होता. मित्र-मैत्रिणी शाळेच्या बाल मुक्तांगण सभागृहामध्ये एकित्रत आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक नव्वदी पार केलेले गुरूवर्य कृष्णराव भारद्वाज होते. व्यासपीठावर यादवराव वडघुले ,सि.रा .कर्वे रायजादे , सोनवणे ,प.ल.कराड, रेखा ठाणगे ,नारायण कर्डिले , तसेच संस्थेचे बाल मुक्तांगण विद्यालयाचे अध्यक्ष नंदलाल चोरिडया, अशोक कर्डिले उपस्थित होते. सामूहिकरीत्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून शालेय प्रार्थना म्हटली. १९८८ ते २०१९ या वाटचालीतील जुन्या आठवणी आजही स्मरणात आणि प्रत्येकाच्या मनाच्या गाभाऱ्यात चिरकाल टिकून राहावे यासाठी प्रत्येक माजी विद्यार्थी व शिक्षकांना स्मृती चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले . प्रास्तविक शिवाजी भोई यांनी केले. सूत्रसंचालन माजी विद्यार्थी प्रा. अरु ण पोटे यांनी केले.