माजी विद्यार्थ्यांचा रंगला स्नेहमेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 02:21 PM2018-05-15T14:21:36+5:302018-05-15T14:21:36+5:30
लोहोणेर : - उत्सव मैत्रीचा हा धागा पकडत तब्बल पंचवीस वर्षानंतर एकत्र येत येथील जनता विद्यालयातून मार्च १९९३ मध्ये शालांत परिक्षा उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांंचा स्नेह मेळावा रंगला.
लोहोणेर : - उत्सव मैत्रीचा हा धागा पकडत तब्बल पंचवीस वर्षानंतर एकत्र येत येथील जनता विद्यालयातून मार्च १९९३ मध्ये शालांत परिक्षा उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांंचा स्नेह मेळावा रंगला. या विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. उपस्थित गुरूजनांच्या हस्ते सरस्वती पूजन करून मेळाव्यास सुरूवात झाली. त्याचबरोबर या पंचवीस वर्षाच्या कालावधीत दिवंगत झालेल्या माजी विद्यार्थी तसेच इतर विद्यार्थ्यांच्या कुटूंबातील मयत सदस्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणा-या शिक्षकांपैकी बी.के.आहिरे, जी.डी.तांदळे, प्रभाकर झाल्टे व के.के.देवरे आदी शिक्षक वृंद याप्रसंगी उपस्थित होते. दोन तप उलटून गेल्यानंतर एकमेकांना भेटणा-या या चाळिशी पार केलेल्या विद्यार्थ्यांच्या चेह-यावर बालपणातील स्नेहांच्या भेटीचा आनंद ओसंडून वाहत होता. सत्तर माजी विद्यार्थी व विद्यार्थींनी या मेळाव्यास उपस्थित होते. शालेय जीवनातील काही गमती जमती सांगत अनेकांनी जुन्या स्मृतींना उजाळा दिला. प्रत्येकाने मंचावर येत आपली ओळख करून दिल्यानंतर सर्वांनी स्वादिष्ट स्नेहभोजनाचा आनंद घेतला. त्यानंतर सर्व अनौपचारिक गप्पांमध्ये रममाण झाले. याप्रसंगी गुरूजनांना शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार झाला. सर्व उपस्थितांना भेटवस्तू देण्यात आल्या. आपल्या कुटूंबांसमवेत आलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटूंब सदस्यांचाही सन्मान करण्यात आला. ६५ दिवसांत अठरा हजार किमीचा प्रवास करीत भारत भ्रमणाला निघालेल्या जळगांव येथील किशोर पाटील व संध्या पाटील या दांपत्याही यावेळी सत्कार झाला. स्थानिक राहणा-या दिनेश शेवाळे, हेमंत जगताप, रितेश परदेशी, प्रकाश पवार, सुधाकर बागूल, नंदिकशोर चौधरी, व अन्य विद्यार्थांनी या कार्यक्र माचे उत्कृष्ठ नियोजन केले. माजी विद्यार्थ्यांपैकी विनोद सोनवणे, मिनाक्षी झाल्टे, अनिता भारती, शालिनी आहिरे, ज्योती पवार, सरला सोनवणे, निर्मला शेवाळे, सुवर्णा धामणे, लता जगताप, संदीप पवार, चेतन दुसाने, मधुकर व्यवहारे, योगिता वाघ, मंदाकिनी परदेशी, संजय नंदन, सुनिल दशपुते, दिपाली तांदळे, नंदा वक्टे, दिनेश चंदन, लिलाबाई शेवाळे उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचलन युवराज गवळी यांनी केले.