पोलीस भरतीसाठी ३० केंद्रांवर परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 01:36 AM2021-11-20T01:36:18+5:302021-11-20T01:36:51+5:30
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी सन २०१९मध्ये राबविण्यात आलेल्या पदभरतीची लेखी परीक्षा शुक्रवारी (दि. १९) शहरातील ३० केंद्रांवर अपवाद वगळता सुरळीत पार पडली. या परीक्षेसाठी १३ हजार ८०० उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी ८० टक्के उमेदवार परीक्षेला उपस्थित होते.
नाशिक : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी सन २०१९मध्ये राबविण्यात आलेल्या पदभरतीची लेखी परीक्षा शुक्रवारी (दि. १९) शहरातील ३० केंद्रांवर अपवाद वगळता सुरळीत पार पडली. या परीक्षेसाठी १३ हजार ८०० उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी ८० टक्के उमेदवार परीक्षेला उपस्थित होते. दरम्यान, अनुचित प्रकार टाळण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने पुणे, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक या जिल्ह्यांत लेखी परीक्षेचे आयोजन केले होते. सुमारे ७२० पदांसाठी राज्यातील सहा जिल्ह्यांत मिळून ४४४ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली होती. नाशिक शहरासह आडगाव, सातपूर, नाशिक रोड, देवळाली कॅम्प, गंगापूर रोड, सारडा सर्कल आदी ठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून परीक्षा दिली.