दिंडोरीमध्ये अतिकुपोषित ७० बालकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 04:23 PM2019-12-07T16:23:27+5:302019-12-07T16:24:03+5:30
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्र म व एकात्मिक बालविकास प्रकल्प, दिंडोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अतितीव्र कुपोषित बालकांच्या शिबिरात ७० बालकांची तपासणी करण्यात आली. तपासणीत आवश्यकता असलेल्या १२ बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले.
दिंडोरी : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्र म व एकात्मिक बालविकास प्रकल्प, दिंडोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अतितीव्र कुपोषित बालकांच्या शिबिरात ७० बालकांची तपासणी करण्यात आली. तपासणीत आवश्यकता असलेल्या १२ बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले.
ग्रामीण रु ग्णालय दिंडोरी येथे गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांच्या मार्गदर्शनानुसार व वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिंडोरी तालुक्यातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. बालरोगतज्ज्ञ डॉ. समीर काळे यांनी बालकांची तपासणी केली. पालकांना पोषण आहाराबाबत डॉ. काळे यांनी मार्गदर्शन व समुपदेशन केले.
तत्पूर्वी या शिबिरासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्र मांतर्गत पथकाने तपासणी करून त्यातील निवडक मुलांना शिबिरासाठी उपस्थित ठेवले. एकूण ७० बालकांची तपासणी करण्यात येऊन त्यातील १२ बालकांना ग्रामीण रु ग्णालयात कार्यरत पोषण पुनर्वसन केंद्रात (एनआरसी)दाखल करण्यात आले. १४ दिवस त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पोषण आहार व औषधे दिली जाणार आहेत. त्यांचे वजन वाढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.
यावेळी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी रमेश बनकर, राकेश कोकणी, डॉ. दीपक बागमार, डॉ. समर्थ देशमुख, अश्विनी वाकचौरे, सुचिता पाचोरे, गौरी निराली, तुषार पाटील व सीमा गांगुर्डे आदींसह ग्रामीण रु ग्णालय व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्र माचे कर्मचारी उपस्थित होते.