नऊ तासात ५०८ रुग्णांची तपासणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:10 AM2021-07-23T04:10:57+5:302021-07-23T04:10:57+5:30
चांदवड : णमोकार तीर्थ प्रणेता राष्ट्रसंत देवनंदीजी महाराज यांचा जन्मदिन महोत्सवानिमित्ताने णमोकार तीर्थ येथे साधू वासवाणी मिशन पुणे ...
चांदवड : णमोकार तीर्थ प्रणेता राष्ट्रसंत देवनंदीजी महाराज यांचा जन्मदिन महोत्सवानिमित्ताने णमोकार तीर्थ येथे साधू वासवाणी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग रुग्णांसाठी शिबिर झाले. ओम पाटणी, विनोद पाटणी, पूनम संचेती, पिंटू संचेती, डॉ. मनोज छाजेड, नितीन फंगाळ, राकेश जैन, साहिल जैन, मिलिंद जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचा शुभारंभ केला. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, पंचायत समिती सदस्य नितीन आहेर, कारभारी आहेर, महावीर छाजेड, वर्धमान पांडे, संजय छाजेड, सुजन ओस्तवाल, कुणाल रहाणो, प्रकाश साबळे, तेजस रहाणो उपस्थित होते. पुणे येथील साधू वासवाणी मिशनचे स्वयंसेवक मिलिंद जाधव, सुशील ढगे, साहिल जैन, राहुल सरोज, ज्ञानेश्वर पाटील आदींनी ५०८ दिव्यांग रुग्णांची सलग नऊ तास तपासणी केली. त्यात ४९३ दिव्यांग रुग्णांना तुटलेले हात-पाय बसविण्यासाठी मापे घेण्यात आली. ४९३ व्यक्तींना एक महिन्यांनंतर कृत्रिम हाथ व पाय बसविण्यात येणार असल्याची माहिती संयोजक ओम पाटणी यांनी यावेळी दिली. यानिमित्त अर्पण ब्लड बँकतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. यात दिव्यांग रुग्णांसहित ३४ जणांनी रक्तदान केले. बालब्रह्मचामरी वैशाली दीदी यांनी आभार मानले. नीलेश अजमेरा, दर्शन अजमेरा, योगेश अजमेरा, राजेंद्र अजमेरा, कमलेश अजमेरा, पवन पाटणी, जीवन पाटणी, दीपक गादीया, हरिश्चंद्र ठाकरे, रोहित देव, पवन प्रजापत, नीलेश जाधव, विलास रहाणो, भिडे, जैन नवयुवक मंडळ वडाळीभोई आदींनी परिश्रम घेतले.
-------------------------------
चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थ येथे दिव्यांग शिबिरप्रसंगी उपस्थित राष्ट्रसंत देवनंदीजी महाराज, ओम पाटणी, विनोद पाटणी, पूनम संचेती, पिंटू संचेती, डॉ. मनोज छाजेड, नितीन फंगाळ, राकेश जैन, वैशाली दीदी व शिबिरार्थी. (२२ एमएमजी २)
220721\22nsk_20_22072021_13.jpg
२२ एमएमजी २