परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:19 AM2021-02-26T04:19:39+5:302021-02-26T04:19:39+5:30

नाशिक : कोरेानाचा होत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता कोणताही कार्यक्रम घेताना काळजी घेतली पाहिजे अशा सूचना पोलिसांकडून केल्या जात ...

Examination fees will be refunded to the students | परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत मिळणार

परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत मिळणार

Next

नाशिक : कोरेानाचा होत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता कोणताही कार्यक्रम घेताना काळजी घेतली पाहिजे अशा सूचना पोलिसांकडून केल्या जात आहे. पोलीस ठाणेनिहाय पोलीस निरीक्षकांकडून मंगल कार्यालये, तसेच लॉन्स चालकांनी बैठक घेऊन सुरक्षितता नियमांबाबत माहिती दिली जात आहे.

पोलीस ठाणे कार्यान्वित करण्याची गरज

नाशिक : उपनगर येथील म्हसोबा मंदिरासमोर पोलीस ठाणे बांधण्यासाठी जागा निश्चित करण्यात आलेली आहे. उपनगर हद्दीतील गुन्हेगारी लक्षात घेत या ठिकाणी तातडीने पोलीस ठाणे, तसेच पेालीस चौक्या कार्यान्वित करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

उसाची गुऱ्हाळे झाली सूरू

नाशिक : शहरात उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने आता ठिकठिकाणी उसाचे गुऱ्हाळेदेखील सुरू झाली आहेत. सुरक्षिततेसाठी कागदी ग्लासेसचा वापर केला जात असून, ग्राहकदेखील याबाबतची काळजी घेताना दिसत आहेत.

मुद्रणालय कामगारांतर्फे वृक्षारोपण

नाशिक : भारत प्रतिभूती मुद्रणालयातर्फे वृक्षारोपण करण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या सहाकार्याने पर्यावरण ग्रुपच्या माध्यमातून मुद्रणालय गेटसमेार आणि युनियन कार्यालयाशेजारी वृक्षारोपण करण्यात आले आहे. यावेळी युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

एस.टी. कर्मचाऱ्यांकडून लसची मागणी

नाशिक : प्रवाशांसाठी बसेसची सेवा देत असताना नागरिकांमध्ये जावे लागते. सातत्याने गर्दीशी संबंध येत असल्याने एस.टी.च्या चालक वाहकांना, तसेच नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेने पत्रकाद्वारे म्हटले आहे.

महाराणा प्रताप यांना अभिवादन

नाशिक : हिंदू एकता आंदोलन पक्षाच्यावतीने महाराणाप्रताप यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले. पक्षाचे अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. सुनील परदेशी, वीरेंद्रसींह टिळे, राजेंद्र शेळके, प्रसाव बावरी, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Examination fees will be refunded to the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.