महावितरण, महापारेषणच्या कर्मचाऱ्यांसाठी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:49 AM2020-02-17T00:49:28+5:302020-02-17T00:49:52+5:30
महावितरण व महापारेषणच्या कर्मचाऱ्यांच्या दि. १५ व १६ फेब्रुवारी रोजी येथील व्ही. एन. नाईक विद्यालयात परीक्षा घेण्यात आल्या. खातेनिहाय बढती, उच्चश्रेणीतील आर्थिक लाभासाठी या परीक्षांतून कर्मचाºयांना उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याने सदर परीक्षा घेण्यात आली.
एकलहरे : महावितरण व महापारेषणच्या कर्मचाऱ्यांच्या दि. १५ व १६ फेब्रुवारी रोजी येथील व्ही. एन. नाईक विद्यालयात परीक्षा घेण्यात आल्या. खातेनिहाय बढती, उच्चश्रेणीतील आर्थिक लाभासाठी या परीक्षांतून कर्मचाºयांना उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याने सदर परीक्षा घेण्यात आली.
महावितरणच्या नाशिक व अमरावती या दोन विभागीय केंद्रांवर खातेनिहाय परीक्षेसाठी कर्मचारी आले होते. सदर परीक्षेसाठी एकूण ४ पेपर होते. पहिल्या दिवशी सकाळी १० वाजता पहिला पेपर व दुपारी २ वाजता दुसरा पेपर झाला. पहिल्या पेपरला महावितरणचे २०२ परीक्षार्थी तर दुसºया पेपरला १८९ परीक्षार्थी उपस्थित होते. दुसºया दिवशी तिसºया पेपरला महावितरणचे १५१ व महापारेषणचे ६१, चौथ्या पेपरला महावितरणचे १६८ तर महापारेषणचे ५१ परीक्षार्थी उपस्थित होते. या परीक्षा एकलहरे येथील परीक्षा केंद्रांवर शांततेत झाल्या. यासाठी प्रशिक्षण विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक लटपटे यांच्या मार्गदर्शनाखाली मानव संसाधन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक पांडुरंग वेळापूरे, कार्यकारी अभियंता प्रशासन अनिल नागरे यांच्यासह वित्त व लेखा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक, परीक्षा विभागाचे व्यवस्थापक व उपव्यवस्थापक यांच्या नियंत्रणाखाली परीक्षा सुरळीत पार पडल्या.