पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा १६ ऑगस्टपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 08:01 PM2021-05-27T20:01:33+5:302021-05-27T20:02:20+5:30

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची कोविड परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा दि.१६ ऑगस्टपासून घेण्याचे निर्देश विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

Examination for postgraduate medical students from 16th August | पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा १६ ऑगस्टपासून

पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा १६ ऑगस्टपासून

Next

नाशिक : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची कोविड परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा दि.१६ ऑगस्टपासून घेण्याचे निर्देश विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

उन्हाळी सत्र २०२१ मधील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा संदर्भात विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीस प्रभारी कुलगुरु डॉ.नितीन करमळकर, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरव विजय, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचेअधिष्ठाता डॉ. सचिन मुंबरे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यापीठाचे प्रति-कुलपती अमित देशमुख यांनी सांगितले की, विद्यापीठाची उन्हाळी सत्र २०२१ पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा दि. २४ जूनपासून नियोजित करण्यात आली होती. कोविड-१९ ची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे परीक्षेच्या तयारीकरीता विद्यार्थ्यांना ४५ दिवसांचा कालावधी मिळेल. विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भात सविस्तर माहिती व वेळापत्रक विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Web Title: Examination for postgraduate medical students from 16th August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.