बारागावपिंप्री विद्यालयात विद्यार्थ्यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:16 AM2021-02-16T04:16:01+5:302021-02-16T04:16:01+5:30
-------------------------- सिन्नर तालुक्यात कृषिपंपांची थकबाकी सिन्नर : तालुक्यात महावितरणने कृषिपंपांची थकबाकी भरण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. तालुक्यात ३४ ...
--------------------------
सिन्नर तालुक्यात कृषिपंपांची थकबाकी
सिन्नर : तालुक्यात महावितरणने कृषिपंपांची थकबाकी भरण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. तालुक्यात ३४ हजार २२१ शेतकऱ्यांकडे कृषिपंपाची जून २०२० अखेर २६० कोटी ६१ लाख रूपये थकबाकी असून, कृषी धोरण योजनेचा लाभ घेतल्यास १०१ कोटी रूपये शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत.
-----------------
अवकाळीच्या भीतीने शेतकरी धास्तावला
सिन्नर : महाराष्ट्रासह देशात १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान पाऊस पडेल, असा इशारा स्कायमेटने दिला आहे. हा अंदाज खरा ठरला तर त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंतेत पडला आहे. अगोधरच मेटाकुटीस आलेला शेतकरी वर्ग अवकाळी पावसाच्या शक्यतेने धास्तावला आहे.
--------------
सक्तीची वीजबिल वसुली थांबवा
सिन्नर : तालुक्यात महावितरण कंपनीचे अधिकारी सक्तीने शेतकऱ्यांकडून वीजबिल वसूल करत असून, त्यांची वीजजोडणीही तोडण्यात येत आहे. याबाबत शासनदरबारी आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वाचा फोडावी असे निवेदन सिन्नर तालुका भारतीय जनता पक्षातर्फे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना देण्यात आले.
------------------
बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम
नांदूर शिंगोटे : परिसरात गेल्या काही दिवसापासून बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. कधी ढगाळ तर कधी ऊन तसेच रात्रीच्या वेळी थंडी असे वातावरणातील बदल लहान मुले, वयोवृद्धांवर होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दवाखान्यात गर्दी वाढू लागली आहे.