एका रुग्णामागे दहा जणांची तपासणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:09 AM2021-05-03T04:09:27+5:302021-05-03T04:09:27+5:30
माळेगाव औद्योगिक वसाहतीत आयमाने आयोजित केलेले कोविड लसीकरण सत्र, कोविड स्वॅब कलेक्शन केंद्र, तसेच माळेगाव, दोडी बुद्रुक व वडांगळी ...
माळेगाव औद्योगिक वसाहतीत आयमाने आयोजित केलेले कोविड लसीकरण सत्र, कोविड स्वॅब कलेक्शन केंद्र, तसेच माळेगाव, दोडी बुद्रुक व वडांगळी येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षास भेट देऊन पाहणी केली. त्याप्रसंगी शिंदे बोलत होते.
यावेळी गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन बच्छाव आदी उपस्थित होते. माळेगाव ग्रामपंचायतीने उभारलेल्या विलगीकरण केंद्रास भेट देऊन रुग्णांशी चर्चा केली. सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांना कोविडबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या. कोविडबाबत आशा कार्यकर्त्या, शिक्षक यांना सर्वेक्षणाबाबत सूचना दिल्या. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचे कुटुंबीय व आजूबाजूच्या कुटुंबांतील सदस्यांच्या रॅपिड टेस्ट करण्याबाबत सूचना दिल्या.
दोडी बुद्रुकला परिस्थितीचा आढावा
दोडी बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात आढावा घेतला. ग्रामपंचायत विस्तार अधिकारी प्रल्हाद बिब्बे, ग्रामसेवक हासे यांनी गावात ५० रुग्ण असून, त्यापैकी २७ बरे झाले असून दोन जण मयत झाल्याची माहिती दिली. १३ जण होम क्वारंटाइन, तर २ जण संस्थात्मक विलगीकरण कक्षात असल्याचेही ते म्हणाले. जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, सरपंच, उपसरपंच व सदस्य, ग्रामसेवक कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय येथेही भेट देऊन पाहणी केली.
फोटो ओळी- ०२ सिन्नर १
माळेगाव येथे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी संस्थात्मक विलगीकरण कक्षास भेट देऊन पाहणी केली. त्याप्रसंगी गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन बच्छाव, संजय गिरी आदी.
===Photopath===
020521\02nsk_10_02052021_13.jpg
===Caption===
माळेगाव येथे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी संस्थात्मक विलगीकरण कक्षास भेट देवून पाहणी केली. त्याप्रसंगी गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन बच्छाव, संजय गिरी आदी.