नाशकात राज्य सरकारविरोधात परीक्षार्थींची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 07:36 PM2021-03-11T19:36:20+5:302021-03-11T19:42:33+5:30

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कॉलेजरोडवरील प्राचार्य टी. ए. कुलकर्णी सर्कल येथे सरकारविरोधात घोषणाबाजी करीत परीक्षा पूर्वनियोजित वेळेतच घेण्याची मागणी केली. तर पंचवटीतील गणेशवाडी येथे संत ज्ञानेश्वर अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनीही आयोगचे पत्र फाडून सरकारविरोधत निषेध नोंदविला.

Examiners protest against state government in Nashik | नाशकात राज्य सरकारविरोधात परीक्षार्थींची निदर्शने

नाशकात राज्य सरकारविरोधात परीक्षार्थींची निदर्शने

Next
ठळक मुद्देएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षार्थी संतप्त एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षार्थी संतप्त एमपीएससी परीक्षार्थींमध्ये उमटले तीव्र पडसाद

नाशिकः एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कॉलेजरोडवरील प्राचार्य टी. ए. कुलकर्णी सर्कल येथे सरकारविरोधात घोषणाबाजी करीत परीक्षा पूर्वनियोजित वेळेतच घेण्याची मागणी केली. तर पंचवटीतील गणेशवाडी येथे संत ज्ञानेश्वर अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनीही आयोगचे पत्र फाडून सरकारविरोधत निषेध नोंदविला. यासंदर्भात छात्रभारती विद्यार्थी संघटनने प्रशासनाला निवेदन देऊन नियोजित वेळेत परीक्षा घेण्याची मागणी केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरुवारी (दि.११) राज्यात कोरोणाचा प्रभाव वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आल्याने परिपत्रक काढून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केल्याने नाशिकमधील विद्यार्थ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य टी . ए. कुलकर्णी चौकात सरकारविरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन करीत पूर्वनियोजित वेळेतच परीक्षा घेण्यची मागणी केली. यावेळी अभाविपच्या आंदोलकांनी चौकात अचानक आंदोलन केल्याने या भागातील वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला.

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरुवारी परिपत्रक काढून राज्यात कोरोणाचा प्रभाव वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आल्याचे नमूद करीत आता परीक्षा घेणे योग्य नाही असे पत्र पुनर्वसन विभागाचे १० मार्चला पत्र मिळाल्याचे नमूद करीत १४ मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलल्याचे स्पष्ट होते. हे पत्र फाडून गणेशवाडीतील संत ज्ञानेश्वर अभ्यासिकेत परीक्षार्थी सरकार व आयोगाविरोधात निषेध नोंदविला. परीक्षेची तयारी पूर्ण झालेली असताना परीक्षा अचानक पुढे ढकलल्याने शांततेच्या मार्गाने निषेध नोंदविण्यासाठी हे पत्र पाडल्याचे विद्यार्थी प्रतिनिधींनी सांगितले. दरम्यान वारंवार परिक्षा पुढे ढकलली जात असल्याने एमपीएसची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

परीक्षार्थींमध्ये असंतोष
वारंवार परिक्षा पुढे ढकलली जात असल्याने एमपीएसची परिक्षा देणाऱ्या परीक्षार्थींमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे नमूद करीत छात्रभारती विद्यार्थी संघटनेने सरकारवाडा ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांना निवेदन दिले. छात्रभारतीचे प्रतिनिधीमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन देण्यासाठी जात होते.मा जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी अनुपस्थित असल्याने छात्रभारतीच्या प्रतिनिधीमंडळाने याच परिसरात हेमंत सोमवंशी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

Web Title: Examiners protest against state government in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.