आधी उत्खनन, आता आपत्ती; नेहमीच का ओढवते विपत्ती?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:19 AM2021-09-09T04:19:37+5:302021-09-09T04:19:37+5:30
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बाबतीतही अशाच प्रकारे शंकेच्या नजरेतून पाहणाऱ्यांची कमी नाही. वाघमारे यांचा तडकाफडकी राजीनामा, त्यानंतर अतिरिक्त जबाबदारी ...
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बाबतीतही अशाच प्रकारे शंकेच्या नजरेतून पाहणाऱ्यांची कमी नाही. वाघमारे यांचा तडकाफडकी राजीनामा, त्यानंतर अतिरिक्त जबाबदारी असलेल्या कुऱ्हाडे यांची दीड महिन्यातच बदली झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. विभागीय चौकशींचा निघालेला फुसका बार आणि मॅटने जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाला दिलेले एक नव्हे तर अनेक हादरे, याबाबतच्या चर्चांनीही जिल्हा प्रशासनाकडे बोट दाखविले गेले. याचा अर्थ अधिकाऱ्यांना कामाला लावायचेच नाही, असाही होत नाही.
--इन्फो-
चर्चा तर होणारच....
अधिकाऱ्यांवरील विभागीय चौकशीचे सत्र असो की बदलीसंदर्भातील मॅट कोर्टाने दिलेला स्थगिती निर्णय. चर्चा होतच राहणार आहेत. अधिकाऱ्यांना आपल्या न्याय्य हक्कासाठी दाद मागण्याची यंत्रणा असल्याने त्या माध्यमातून ते दाद मागणारच आहेत. एकामागोमाग एक अशी अधिकाऱ्यांची यादी जेव्हा चर्चिली जाते तेव्हा गर्ग यांच्यावरही आपत्ती ओढवते का? अशी शंका उपस्थित करणारे आपत्ती विभागाची ओढाताण का झाली याची पाने चाळतात, निवडणूक शाखेच्या कारभाराची आठवण त्यांना होते, आरोग्य यंत्रणेवरील व्याप अनेकांना आठवतो. खरेतर अशा चर्चांना पूर्णविराम नसतोच. त्यामुळे निर्णय होत राहतील आणि चर्चाही रंगतील. प्रशासकीय कामकाजाच्या रहाटगाडग्यात अशा चर्चांना थारा नसतो.
- संदीप भालेराव,
जिल्हाधिकारी कार्यालयातून