मद्याविना संयम सुटल्याने अखेर चोरट्यांनी 'एक्ससाइज'चे गुदामच फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 03:20 PM2020-04-12T15:20:53+5:302020-04-12T15:23:02+5:30
नाशिक: कोरोना आजारामुळे सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले असून, मद्यपी चोरट्यामार्गाने आपली 'नशा' पूर्ण करताना दिसून येत आहेत. दारू मिळणे अवघड झाल्यामुळे दारूला काळ्या बाजारात मोठी मागणी तर आहेच, शिवाय दामदुप्पट रक्कमही हाती येत असल्याचा फायदा घेत पेरोलवर बाहेर आलेल्या चोरट्यांनी थेट पेठरोडवरील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्ससाइज) मुद्देमालाचे गुदामच फोडल्याची धक्कादायक घटना घडली. या लुटीत चोरट्यांनी देशी-विदेशी प्रकारचे सुमारे तीन लाख रुपयांचा मद्यसाठ्याचा जप्त केलेला मुद्देमाल लंपास केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी पॅरोलवर सुटलेल्या दोघा चोरट्यांनी हे गुदाम फोडले याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. राज्य उत्पादन विभागाचे ऋषिकेश माधवराव फुलझळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पेठरोडच्या फुलेनगर येथील मंगल मिस्तरी शिंदे, रामदास बन्सीलाल पाडेकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या सोमवारी (दि. ६) ते शनिवार (दि.११) कालावधीत राज्य उत्पादन शुल्क कार्यालय गुदामाचा पाठीमागील दरवाजा तोडून आत प्रवेश करत सुमारे साडेतीन लाख रुपये किंमत असलेल्या विविध देशी-विदेशी कंपनीच्या ३ हजार २६४ बाटल्या चोरून नेल्या. पोलिसांनी दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या आहे.
कोरोना आजारामुळे सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यात मद्य दुकाने, वाइन शॉप व बिअर बार बंद असल्याने मद्य पिणाऱ्यांकडून मद्याची चोरी छुप्या पद्धतीने खरेदी केली जात आहे. त्याचाच फायदा घेत या चोरट्यांनी थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलेला मद्यसाठा ठेवलेल्या गुदामाचा दरवाजा तोडून मद्य बाटल्या चोरून नेल्या.