जादा भाड्याचा भुर्दंड मात्र कोरोना उपाययोजनांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:14 AM2021-03-07T04:14:09+5:302021-03-07T04:14:09+5:30

रेल्वेच्या एका बोगीमध्ये ७२ प्रवासी आसनव्यवस्था आहे. रेल्वे प्रशासनाकडून एका बोगीसाठी ७२ आरक्षण तिकीट दिले जात असल्याने दोन व्यक्तींनी ...

Excessive rent, however, ignores corona measures | जादा भाड्याचा भुर्दंड मात्र कोरोना उपाययोजनांकडे दुर्लक्ष

जादा भाड्याचा भुर्दंड मात्र कोरोना उपाययोजनांकडे दुर्लक्ष

Next

रेल्वेच्या एका बोगीमध्ये ७२ प्रवासी आसनव्यवस्था आहे. रेल्वे प्रशासनाकडून एका बोगीसाठी ७२ आरक्षण तिकीट दिले जात असल्याने दोन व्यक्तींनी सुरक्षित अंतर ठेवावे या आदेशाला रेल्वे प्रशासनच काळिमा फासत असल्याचे वास्तव्य आहे. शिवाय रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस, तिकीट तपासणीस यांच्याकडून मास्कबाबत कठोर कारवाई केली जात नसल्याचे पाहून कोरोना बाबत रेल्वे प्रशासन व संबंधितांना काहीच सोयरसुतक नसल्याचे चित्र दिसत आहे.

------

१) पंचवटी एक्स्प्रेेस

२) गीतांजली एक्स्प्रेस

३) दरभंगा एक्स्प्रेस

४) मुंबई हावडा सुपरफास्ट

५) हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस

६) राजधानी एक्स्प्रेस

७) मंगला एक्स्प्रेस

८) पंजाब मेल

९) काशी एक्स्प्रेस

१०) पुष्पक एक्स्प्रेस

-----------

* ६० येणाऱ्या गाड्या

* ६० जाणाऱ्या गाड्या

* एकूण रेल्वे गाड्या १२०

--------

चौकट==

एकच मार्ग असतानाही कारवाई शून्य

नाशिकरोड रेल्वेस्थानकात जाण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी मुख्य एकच प्रवेशद्वार सुरू आहे. इतर सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. तरीदेखील मास्क न वापरणाऱ्याविरुद्ध फक्त नावापुरती किरकोळ कारवाई केली जात आहे. रेल्वे प्रशासनाकडून कुठलेच गांभीर्य पाळले जात नसल्याचे चित्र आहे.

-------

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशद्वारावरच प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जात असून, तापमान व ऑक्सिजनची नोंद प्रवासीनिहाय घेतली जात आहे. याशिवाय ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून प्रवाशांना सुरक्षित अंतर पाळण्याचे आवाहन केले जात आहे.

आर. के. कुठार, रेल्वे अधिकारी

Web Title: Excessive rent, however, ignores corona measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.