मद्यविक्रीकरिता उत्पादन शुल्क विभागाने लढविली शक्कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 06:59 PM2020-05-06T18:59:50+5:302020-05-06T19:01:06+5:30
नाशिक : लॉकडाउन काळात गेल्या सोमवारी मद्यविक्रीसाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली होती. यावेळी मद्यपींची मद्यखरेदीकरिता एकच झुंबड उडाल्यामुळे ...
नाशिक : लॉकडाउन काळात गेल्या सोमवारी मद्यविक्रीसाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली होती. यावेळी मद्यपींची मद्यखरेदीकरिता एकच झुंबड उडाल्यामुळे ‘डिस्टन्स’ नियमांचे तीनतेरा झाले आणि लॉकडाउनचा फज्जादेखील उडाल्याचे चित्र शहरात दिसून आले. पोलिसांना गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य स्वरुपात बळाचाही वापर करावा लागला होता. यानंतर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी तत्काळ मद्यविक्री बंदीचे आदेश काढले. यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मद्यविक्रीबाबतचे व्यवस्थापन सोपविण्यात आले असून या विभागाने चाचपणी शहरात सुरू केली आहे. उत्पादन शुल्क विभाग गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विक्रेत्यांना टोकन पध्दतीचा अवलंब करण्यासाठी प्रवृत्त करत असून शहरात टोकन किंवा कुपनद्वारे मद्यविक्री मर्यादित ग्राहकांना केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान, राज्य उत्पादन उत्पादन शुल्क विभागाकडून मद्य दुकाने सुरु करण्याबाबत ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्याची माहिती मिळताच शहरातील मद्यव्रिकीची दुकाने पुन्हा सुरू होणार असल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. यानंतर पुन्हा शेकडोंच्या संख्येने मद्यपींनी आपल्या जवळच्या दुकानांजवळ कुपन अथवा टोकन घेण्यासाठी रणरणत्या रांगा लावल्याचे दिसून आले.
यामध्ये ग्राहकाला ठराविक चिट्ठी दिली जाईल. यामध्ये ग्राहकाने स्वत:चे नाव, मोबाईल नंबर, मद्याची मागणी इत्यादी गोष्टी एका कागदावर लिहून दुकानदाराला द्यावयाच्या आहेत. यानुसार दर तासाला ५० ग्राहकांना मद्य विक्र ी केले जाऊ शकते असा अंदाज राज्य उत्पादन विभागाकडून वर्तविला गेला आहे. दिवसभरातून एकूण ४०० ग्राहकांना मद्यविक्र ी केली जाईल. अगोदरच्या दिवशी ज्या ग्राहकांना मद्य मिळू शकले नाही त्यांना दुसºया दिवशी मद्य उपलब्ध करून देण्याची सोय करावी असेही राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे यांनी सांगितले आहेत.
अंचुळे यांनी एक परिपत्रक जारी केले असून त्यानुसार, ग्राहकांना सदर मागणीपत्राचा नमुना दिल्यानंतर त्यांना टोकन क्र मांक देण्यात यावा. जर टोकन उपलब्ध नसतील तर एका को-या कागदावर दुकानदाराने स्वत:च्या दुकानाचा शिक्का व दुरध्वनी क्र मांक देऊन त्यावर अनुक्र मांक द्यावा. तो अनुक्र मांक ग्राहकाला दिलेल्या अनुक्रमांकाचच असावा साधारणपणे अशा ५० ग्राहकांना सेवा एका तासात दिली जावू शकते. त्यानंतर पुढील तासात ५१ ते १०० क्र मांक असे ८ तासात जास्तीत जास्त ४०० लोकांना मद्यविक्री सहज करता येऊ शकेल असे उत्पादन शुल्क विभागाने म्हटले आहे.
गर्दी झाल्यास कायदेशीर कारवाई
त्यामुळे ४००च्या पुढे येणा-या ग्राहकांना दुस-या दिवशी मद्य पुरविले जाईल, हे स्पष्टपणे सांगावे म्हणजे गर्दीवर नियंत्रण मिळविता येईल, असेही स्पष्टपणे म्हटले आहे. याशिवाय दुकानाच्या अगदी जवळ कोणतही विशिष्ट वेळी ५पेक्षा जास्त ग्राहक उभे राहणार नाहीत याची पुरेपुर दक्षता संबंधित मद्यविक्री करणाºया विक्रेत्याने घ्यावयाची आहे, कुठल्याहीप्रकारे नियम व अटींचा भंग होताना आढळून आल्यास मद्यविक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई पोलीस व उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येणार आहे.
मास्क व डिस्टन्स बंधनकारक
दुकानदाराने दर १५ मिनीटानंतर अथवा आवश्यकतेनुसार कोणत्या ग्राहकाचा टोकन क्र मांकाची सेवा सुरू आहे ते सुचनाफलकारवर नमुद करावे. यातून गर्दी कमी होण्यास मदत होईल. ग्राहकांनी तोंडाला मास्क व परस्परांमध्ये ‘डिस्टन्स’ ठेवणे आवश्यक असून यासाठी विक्रेत्यांनी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करुन शिस्तीत मद्यविक्री करावयाची आहे, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
--इन्फो--
निरिक्षक, दुय्यम निरिक्षक ‘झोनल आॅफिसर’
विभागातील निरीक्षक व दुय्यम निरीक्षक यांना परिमंडळ अधिकारी म्हणुन विशिष्ट भागासाठी नियुक्त करण्यात आले आहे. तसेच भरारी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात गर्दीच्या एफएल-२ अनुज्ञप्तीच्या ठिकाणी वारंवार भेटी देत पाहणी करून योग्य त्या सुचना करावयाच्या असल्याचे म्हटले आहे. नियमांचे भंग करणाºयांविरूध्द कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आले आहे.