लॉकडाउनमुळे ‘एक्साइज’ला ४०० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 12:02 AM2020-04-03T00:02:03+5:302020-04-03T00:02:21+5:30

मद्यविक्र ीच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत कोट्यवधीचा महसूल जमा करत कायम अव्वलस्थानी राहिलेल्या नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला यंदा उद्दिष्ट गाठणे कठीण झाले आहे. मार्चएण्डच्या ऐन वसुलीच्या काळात कोरोना या जीवघेण्या आजाराने तोंड काढल्याने लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे मद्य खरेदी-विक्र ीवरसुद्धा निर्बंध आणले गेले. मद्यविक्र ीच्या दुकानांचे शटर डाउन झाले. यामुळे या विभागास तब्बल ४०० कोटींचा फटका बसला आहे.

'Excise' hits 3 crore due to lockdown | लॉकडाउनमुळे ‘एक्साइज’ला ४०० कोटींचा फटका

लॉकडाउनमुळे ‘एक्साइज’ला ४०० कोटींचा फटका

googlenewsNext
ठळक मुद्देउद्दिष्ट गाठणे अवघड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मद्य खरेदी-विक्रीवर निर्बंध

नाशिक : मद्यविक्र ीच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत कोट्यवधीचा महसूल जमा करत कायम अव्वलस्थानी राहिलेल्या नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला यंदा उद्दिष्ट गाठणे कठीण झाले आहे. मार्चएण्डच्या ऐन वसुलीच्या काळात कोरोना या जीवघेण्या आजाराने तोंड काढल्याने लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे मद्य खरेदी-विक्र ीवरसुद्धा निर्बंध आणले गेले. मद्यविक्र ीच्या दुकानांचे शटर डाउन झाले. यामुळे या विभागास तब्बल ४०० कोटींचा फटका बसला आहे.
देशी-विदेशी मद्यासह वाइन कॅपिटल अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्णाने राज्याच्या महसुलात आपले स्थान कायम अव्वल राखले आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून महसुलात अव्वल राहण्याची परंपरा कायम राखणाऱ्या या विभागास उद्दिष्ट गाठण्यास मात्र यंदा घरघर लागली आहे. नाशिक जिल्ह्णात सुमारे एक हजाराहून अधिक परवानाधारक विक्र ेते तसेच देशी-विदेशी मद्यनिर्मितीचे कारखाने आहेत. या जिल्ह्णातील दारू राज्यासह केंद्र शासित आणि विदेशातदेखील पुरवठा केली जाते. तर सर्वाधिक वाइनरींची संख्याही याच जिल्ह्णात असल्याने मोठ्या प्रमाणात महसूल गोळा केला जातो. त्यामुळे दरवर्षी नाशिक जिल्हा महसुलात अव्वल राहतो. यंदा या विभागास ३ हजार ४०० कोटी रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट असून, मार्च ते डिसेंबर २०१९ या काळात एक्साइज विभागाने तीन हजार कोटी रुपये वसुली केली आहे. मात्र यंदा कोरोना आजाराने तोंड वर काढल्याने उर्वरित ४०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठणे या विभागास कठीण झाले आहे.
कोरोनामुळे कार्यालयीन संख्या आटोक्यात आणली असली तरी हा विभाग दारूबंदीमुळे पुरता कामाला लागला आहे. अवैध दारूविक्र ी आणि वाहतूक रोखण्यासाठी शहरासह जिल्हाभरात नाकाबंदी तसेच छापासत्र या विभागाकडून राबविले जात आहे. एकूणच याचा परिणाम महसूल वसुलीवर झाला आहे.
संसर्गजन्य असलेला हा आजार टाळण्यासाठी शासनस्तरावरून राज्यभरात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. देशी-विदेशी दारू दुकानांसह परिमट रूममध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, त्याचा परिणाम एक्साइज विभागाच्या उद्दिष्टावर झाला आहे. # मद्यनिर्मितीचा महसूल दरमहा जमा होत असला तरी देशी-विदेशी दारू परवानाधारकांचे नूतनीकरण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात होत असल्याने हा फटका सहन करावा लागला आहे.

Web Title: 'Excise' hits 3 crore due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.