सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागात गणरायाचे उत्साहात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 07:03 PM2020-08-22T19:03:41+5:302020-08-22T19:04:21+5:30

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागात गणरायाचे उत्सहात आगमन झाले. सार्वजनिक मंडळा ऐवजी यंदा घरातील गणपतींची स्थापना मोठ्या प्रमाणात करण्यात आली.

Excited arrival of Ganarayya in the northern part of Sinnar taluka | सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागात गणरायाचे उत्साहात आगमन

सिन्नरच्या उत्तर भागात गणपतीची स्थापना करण्यासाठी बच्चे कंपनीचे सदस्य ढोल वाजून स्वागत करत होते.

Next
ठळक मुद्दे सजावाटीचे साहित्य व पुजेसाठी लागणाºया साहित्यांची खरेदी करण्यास गर्दी

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागात गणरायाचे उत्सहात आगमन झाले. सार्वजनिक मंडळा ऐवजी यंदा घरातील गणपतींची स्थापना मोठ्या प्रमाणात करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक गणपती उत्सवास प्रशासनाने मनाई केली आहे. त्यामुळे नायगाव खोऱ्यातील गावांमध्ये सार्वजनिक मंडळांनी यावर्षी श्रींची स्थापना केली नाही. असे असले तरी यंदा घरघुती गणपतीची स्थापना करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सकाळ पासूनच नायगाव येथे परिसरातील गणेश भक्तांनी मुर्ती, सजावाटीचे साहित्य व पुजेसाठी लागणाºया साहित्यांची खरेदी करण्यास गर्दी झाली होती.
दुपार नंतर घरोघरी गणेशाची स्थापना करण्यास सुरूवात झाली. यंदा लाउडस्पीकरवर बंदी असल्याने गणरायाची शांततेत स्थापना होत असल्याचे चित्र बघायला मिळाले. दरम्यान बच्चे कंपनीचा उत्साह ओसंडून वाहत होता. किरकोळ ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात बप्पाचे स्वागत करण्यात आले.

Web Title: Excited arrival of Ganarayya in the northern part of Sinnar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.