जिल्ह्यात दहीहंडी उत्साहात

By admin | Published: August 25, 2016 11:58 PM2016-08-25T23:58:53+5:302016-08-26T00:02:46+5:30

उत्सव : श्री नाथ नवरात्रोत्सव, श्रीकृष्ण जयंतीनिमित्त शाळा, महाविद्यालयांसह चौका चौकात विविध कार्यक्रम

The excitement of Dahihandi in the district | जिल्ह्यात दहीहंडी उत्साहात

जिल्ह्यात दहीहंडी उत्साहात

Next

निफाड : येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्रात श्री नाथ नवरात्र उत्सव व श्रीकृष्ण जयंती उत्सवाची गुरुवारी गोपाळकाल्याने सांगता झाली.
श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख वि.दा.व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार, दि. १९ आॅगस्ट ते २४ आॅगस्टदरम्यान सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, उमामहेश्वर मंदिर, स्वामी परमहंस मंदिर या मंदिरात दररोज श्री नवनाथ पारायण व श्रीमद्भागवतरची पारायणे झाली. गुरुवारी श्री कानिफनाथ जयंती व श्री कृष्ण जन्मोत्सवाचे आयोजन स्वामी समर्थ मंदिरात करण्यात आले होते.
गुरुवारी श्री स्वामी समर्थ मंदिरात गोपालकाला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील वैनतेय शिशुविहार मंदिराच्या चिमुरड्यांनी श्री कृष्ण वेश धारण करून स्वामी समर्थ मंदिराच्या प्रांगणात दही हंडी फोडली व गोपाळकाला साजरा केला. याप्रसंगी वि.दा. व्यवहारे, ना.भा. ठाकरे, सुभाष खाटेकर, वैनतेय शिशुविहारच्या मुख्याध्यापक प्रसन्ना कुलकर्णी, शिक्षक भारती पाठक, छाया नवले, ज्योती देवरे, वैशाली सोनवणे, अपर्णा कुंभार्डे, सविता मगर, अर्चना कापसे, सोनाली कदम तसेच सेवक सरला सैंद्रे, सरला शिवदे आदिंसह बालवाडीचे बालगोपाल उपस्थित होते.
खामखेड्यात उत्सव
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
गावातील पुरातन श्रीराम पंचायत मंदिरात असलेले श्रीकृष्ण मंदिर परिसर सजविण्यात आला होता. परंपरागत गावातील भटजी नारायण बुवा यांच्या हस्ते पूजा करण्यात येऊन श्रीकृष्णाच्या मूर्ती अलंकरांनी सजविण्यात येऊन रात्री मंदिरात भजनाच्या कार्यक्रम ठेवण्यात येऊन त्यात श्रीकृष्णाच्या गौळणी, भक्तिगीत पाळणा, भारूड, पोवाडा आदि सादर करण्यात येऊन रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी ८ वाजेपासून श्रीकृष्ण भक्तांनी श्रीकृष्ण यांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केली होती. सनई, भूपाळी, भजन, आरती करण्यात येऊन दुपारी दहीहंडीचा कार्यक्रम ठेवण्यात येऊन दहीहंडी फोडण्यात येऊन प्रसाद वाटण्यात आला. यावेळी श्रीकृष्णाच्या मोठ्या भक्तिभावाने भाविकांनी दर्शन घेतले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक कृष्णा मोरे, ह.भ.प. गोरख शेवाळे, सुरेश शिरोरे, नीलेश शिरोरे, दादाजी बोरसे, सुभाष बिरारी, बाळू मोरे, धर्मा बच्छाव, किरण कासार यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
वारकरी परंपरेनुसार जन्माष्टमी
पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथील हनुमान मंदिरात संत तुकाराम सांप्रदायिक भजनी मंडळाकडून सालाबादप्रमाणे वारकरी सांप्रदायाच्या नियमानुसार व परंपरेनुसार श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव व गोपाळकाला, दहीहंडी उत्सव, रात्री १२ वाजेपर्यंत संतांचे अभंग गात, भजन करत, टाळ-मृदंगाच्या गजरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संत तुकाराम भजनी मंडळ हे परंपरेनुसार दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करत असून, यंदाही या भजनी मंडळाकडून श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गावातील हनुमान मंदिरात भजन जागर ठेवण्यात आले होते.
भजन जागरात संतांनी रचलेले श्रीकृष्ण जन्माचे अभंग टाळ-मृदंगाच्या गजरात गात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली गेली. यावेळी भजन गात मध्यरात्री १२ वाजता भगवान श्री कृष्णाची विधिवत पंचामृताने स्रान घालून, फुलांची माळ अर्पण करून धने व साखरेचा मिश्रित प्रसाद वाटप करण्यात आला. तसेच भगवान श्री कृष्णाची प्रतिमा फुलांनी सजवलेल्या पाळण्यात ठेवून संतानी रचलेले पाळणे म्हणत कृष्ण जन्म साजरा करण्यात आला. खिरापत प्रसादाचे वाटप करून उपवास सोडण्यात
आला.
पालखी मिरवणुकीनंतर दहीहंडी फोडून काल्याच्या प्रसाद एकमेकांना भरविण्यात आला. वारकरी सांप्रदायाच्या नियमानुसार दहीहंडीला, वीणा लावून दहीहंडी फोडण्यात आली नंतर सर्व वारकरी बांधवानी व गावकऱ्यांनी, बालगोपालांनी काल्याचा तो प्रसाद एकमेकांना भरवत दहीहंडी उत्सव साजरा केला. परंपरेनुसार पिळकोस येथे कृष्ण जन्म व गोपाळकाला उत्सव दोन दिवस साजरा करण्यात आला. रात्री कृष्ण जन्म व दुसऱ्या दिवशी गोपालकाला, दहीहंडी उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. संत तुकाराम भजनी मंडळ, केरोबा भजनी मंडळ, गावातील वारकरी बांधव, महिला एकत्रितपणे कृष्ण जन्म व गोपालकाला उत्सव साजरा करतात. भगवान श्री कृष्ण की जय, भगवान श्री कृष्ण की जय, अशा नामघोषाने गाव दुमदुमून गेले होते.
भजनी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र वाघ, उपाध्यक्ष अभिजित वाघ व खजिनदार सचिन वाघ, सागर वाघ, अमोल वाघ, कारभारी सूर्यवंशी, डोंगर पवार, दिलीप सूर्यवंशी, बुधा जाधव, भिला बच्छाव, राकेश सूर्यवंशी, समाधान अहेर यासह ग्रामस्थांनी दहीहंडी उत्सवासाठी विशेष परिश्रम घेतले. (वार्ताहर)

Web Title: The excitement of Dahihandi in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.