जिल्ह्यात हरितालिका उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 01:30 PM2018-09-12T13:30:09+5:302018-09-12T13:30:23+5:30
ओझर-महिला आणि उपवर मुली यांचा अतिशय पवित्र, श्रद्धेचा सण म्हणजे हरतालिका. खेड्यात तसेच शहरी भागात देखील हा सण मोठ्या भक्ती भावनेने साजरा करण्यात आला.
ओझर-महिला आणि उपवर मुली यांचा अतिशय पवित्र, श्रद्धेचा सण म्हणजे हरतालिका. खेड्यात तसेच शहरी भागात देखील हा सण मोठ्या भक्ती भावनेने साजरा करण्यात आला. गावातील मंदिरात किंवा एखाद्या मोकळ्या जागेत महिला पुजापाठ करतात. पुजेसाठी पौरोहित्य पुजा मंत्रोच्चार करून साजरी झाली. या सासुरवाशिनी महिला माहेरी येऊन साजरा करतात. पुजाविधीसाठी विविध प्रकारचे फळे ,पुजा साहित्य असते. महिलांनी पुजा करून घरोघरी जाऊन फराळ, चहापान केला. आजही अनेक पारंपरिक सण मोठ्या भक्तिभावाने साजरा केले जातात. घराला सौख्य ,संपदा प्राप्त व्हावे तसेच सुख आणि शांती मिळेल या भावनेने पुजा केली.