‘नाशिक सिटी रन’ उत्साहात
By admin | Published: December 27, 2015 10:59 PM2015-12-27T22:59:50+5:302015-12-27T23:03:01+5:30
‘नाशिक सिटी रन’ उत्साहात
‘नाशिक सिटी रन’ उत्साहातनाशिक : नाशिक शहर परिसरातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने स्टायडर्सतर्फे ‘नाशिक सिटी रन’ चे रविवारी (दि.२७) आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेअंतर्गत लहान मुलांसाठी १ मैल, ५ किमीसाठी ओपन फिटनेस रन आणि अर्ध मॅरेथान मार्गाचा अंतर्भाव करण्यात आला होता.
अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी स्पर्धेला झेंडा दाखवून
केले. रविवारी झालेल्या ‘नाशिक सिटी रन’मध्ये जवळपास १००० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. ओपन फिटनेस रनचे उद्घाटन डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले, तर लहान मुलांसाठी आयोजित केलेल्या किडस् रनचे उद्घाटन राजीव जोशी यांनी केले. त्र्यंबक रोड येथील फ्रावशी अकॅडमी येथून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. अतिशय उत्साहात पार पडलेल्या या स्पर्धेत युवकांची संख्या जास्त होती. पिवळसर रंगाचा टी शर्ट घातलेले स्पर्धक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
यावेळी फ्रावशी अकॅडमीचे रतन लथ, पोलीस उपायुक्त विजय पाटील, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, अतिरिक्त आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त प्रशांत वाघुंदे, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, स्टायडर्सचे संचालक प्रफुल्ल उचिल आणि दीपक लोंढे आदि उपस्थित
होते. (प्रतिनिधी)