अधिकमासानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 04:46 PM2018-05-28T16:46:30+5:302018-05-28T16:46:30+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास येथे आधिकमास निमित्ताने चार दिवस विविध धार्मिक कार्यक्र म संपन्न झाले. यावेळी ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख व उपजिल्हाधिकारी गोविंद शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास येथे आधिकमास निमित्ताने चार दिवस विविध धार्मिक कार्यक्र म संपन्न झाले. यावेळी ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख व उपजिल्हाधिकारी गोविंद शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. चास येथे आधिकमास महिन्याचे औचित्य साधून महंत काशिकानदंजी महाराज यांच्या प्रेरणेने व निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चार दिवशीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच नंदाताई भाबड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्र मास व्यासपीठावर आमदार राजाभाऊ वाजे, माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. शीतल सांगळे, ह.भ.प.निवृत्ती देशमुख, शिवसेना नेते उदय सांगळे, बाजार समितीचे संचालक सुनील चकोर, जगन्नाथ खैरनार उपस्थित होते. ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांना महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्ती पुरस्कार मिळाला तसेच सिन्नर तालुक्याचे भूमिपुत्र गोविंद शिंदे यांची उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली त्यानिमित्ताने चास ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व शाल देवून देशमुख व शिंदे यांना गौरविण्यात आले. निवृत्ती महाराज देशमुख यांचे काम निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी असून राज्यभर ते कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन व व्यसनमुक्तीसाठी अहोरात्र सेवा करत असल्याचे प्रतिपादन आमदार राजाभाऊ वाजे यांनी यावेळी केले. तसेच गोविंद शिंदे यांची उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाल्याने निश्चितच तालुक्यासाठी भूषणावह गोष्ट असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगन्नाथ खैरनार, संपत खैरनार, बंडुनाना भाबड, संजय खैरनार, चंद्रशेखर खैरनार, सचिन बिडगर, विश्वास भाबड, गुलाब गोसावी, शांताराम सोनवणे, भारत भाबड, बबनराव खैरनार यांनी परिश्रम घेतले. बंडूनाना भाबड यांनी सूत्रसंचालन केले.