जिल्हास्तरीय विज्ञान कार्यशाळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 04:17 PM2020-09-10T16:17:18+5:302020-09-10T16:17:59+5:30

सिन्नर: विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विज्ञान विषयाचे उपयोजन महत्वाचे असल्याने विज्ञान शिक्षकांनी सतत प्रयोगशील असले पाहिजे असे प्रतिपादन माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी केले.

Exciting district level science workshop | जिल्हास्तरीय विज्ञान कार्यशाळा उत्साहात

जिल्हास्तरीय विज्ञान कार्यशाळा उत्साहात

Next
ठळक मुद्देइंस्पयार अवॉर्ड, एन एम एस व एम टी एस परीक्षा आदी विषयांवर मार्गदर्शन

सिन्नर: विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विज्ञान विषयाचे उपयोजन महत्वाचे असल्याने विज्ञान शिक्षकांनी सतत प्रयोगशील असले पाहिजे असे प्रतिपादन माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी केले. सिन्नर तालुक्यातील बारागावपिंप्री येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान कार्य शाळेच्या त्या बोलत होत्या. झनकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान कार्यशाळेस व्यासपीठावर माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी अनिल शहारे, प्रमुख मार्गदर्शक रविंद्र शास्त्री, विज्ञान पर्यवेक्षक आर डी बछाव, नाशिक तालुका विस्तार अधिकारी एम यु पिंपलकर, बारागाव पिंप्री विद्यालयाचे प्राचार्य अशोक बागुल, उपप्राचार्य संजय सूर्यवंशी, पर्यवेक्षक दत्तात्रय पवार, भाऊराव गुंजाळ आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विद्याल्यातर्फे अध्यक्ष व अतिथीचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य अशोक बागुल रविंद्र शास्त्री, आर डी बछाव आदींची भाषणे झाली. कार्यशाळेत विज्ञान प्रदर्शन आयोजन इंस्पयार अवॉर्ड, एन एम एस व एम टी एस परीक्षा आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

बारागावपिंप्री येथील जिल्हास्तरीय विज्ञान कार्यशाळेस उपस्थित माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती वैशाली वीर, उपशिक्षणाधिकारी अनिल शहारे, अशोक बागूल यांच्यासह मान्यवर. (१० सिन्नर १)

Web Title: Exciting district level science workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.