आॅनलाइन कामांवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:21 AM2017-10-11T00:21:55+5:302017-10-11T00:22:34+5:30
शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष रावसाहेब बहिरू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आॅनलाइन कामांवर बहिष्कार व शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत गटशिक्षणाधिकारी श्रीमती जे.सी. चौधरी यांना निवेदन देण्यात आले.
दिंडोरी : शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष रावसाहेब बहिरू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आॅनलाइन कामांवर बहिष्कार व शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत गटशिक्षणाधिकारी श्रीमती जे.सी. चौधरी यांना निवेदन देण्यात आले.
उच्च न्यायालयाचा शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, असा आदेश असतानाही प्रशासन स्वत:च्या सोयीसाठी शिक्षकांना आॅनलाइन-सारखे अशैक्षणिक कामे देत आहे. त्यासाठी आवश्यक तांत्रिक सामग्री (संगणक, इंटरनेट सुविधा) उपलब्ध करून दिलेली नसून मोठ्या प्रमाणात या कामांसाठी वेळ खर्ची पडत असून, हे सयुक्तिक नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आॅनलाइन कामांवर बहिष्कार टाकत असून, विद्यार्थी व शिक्षक हितासाठी सर्व संघटनांनी एकजूट दाखवून अशैक्षणिक अशा आॅनलाइन कामांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. याप्रसंगी कार्यवाह रवींद्र ह्याळीज, राजेंद्र खैरनार, सुभाष बर्डे, संदीप झोटिंग, त्र्यंबक दिवे, नितीन शिंदे, सचिन गुंजाळ, भाऊसाहेब भदाणे, किशोर चंदन, देवकुमार जाधव, पंकजकुमार गवळी, मिलिंद इंगळे, रवींद्र काकुळते, मिलिंद धिवरे, प्रभुदास वळवी, प्रवीण निकुंभ, सुधाकर नाठे, शिवाजी भोसले, कामडी, पवार, आरती जाधव, प्रमिला गांगुर्डे, राहुल जगताप, पुंडलिक शिंगाडे, सुदाम बोडके आदी उपस्थित होते.