मलमूत्राने नागरिकांच्या आरोग्यास धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:14 AM2021-05-26T04:14:32+5:302021-05-26T04:14:32+5:30
वडाळा गावात ५० ते ६०च्या आसपास गोठे व त्यात पाचशे ते सहाशे जनावरे आहेत. काही गोठेधारकांनी जनावरांचे मूत्र गोठ्याबाहेर ...
वडाळा गावात ५० ते ६०च्या आसपास गोठे व त्यात पाचशे ते सहाशे जनावरे आहेत. काही गोठेधारकांनी जनावरांचे मूत्र गोठ्याबाहेर सोडले आहे, तर काहींनी महापालिकेची परवानगी नसतानाही सर्रासपणे भूमिगत गटारीच्या योजनेला पाइप टाकून मलमूत्र सोडून दिले आहे. त्यामुळे घाण व दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरीही भूमिगत गटार योजनेचे अधिकारी वर्ग बघ्याची भूमिका घेत असल्याने, परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
कोट-==
वडाळा गावातील जनावरांच्या गोठेधारकांनी भूमिगत गटार योजनेत मलमूत्र पाइप टाकून सोडले असल्याची नागरिकांनी तक्रार केली. तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, भूमिगत गटार योजना फक्त गटारीचे पाणी सोडण्याचे असताना, जनावरांच्या गोठ्यातील मलमूत्र सोडण्यात आल्याचे निदर्शनात आले. त्याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र देऊ.
- ॲड.श्याम बडोदे, प्रभाग सभापती