कार्यकारी अभियंत्याचा पदभार कनिष्ठ अभियंत्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 12:28 AM2020-03-07T00:28:03+5:302020-03-07T00:29:57+5:30

जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागात कार्यकारी अभियंता रजेवर गेल्यानंतर त्यांच्याशी समकक्ष असलेल्या अधिकाऱ्याकडे अतिरिक्तपदभार देणे गरजेचे असताना चक्क कनिष्ठ अभियंत्याकडे (ज्युनिअर) पदभार देण्याचा प्रकार घडला असून, विशेष म्हणजे ज्या अधिकाºयाकडे अतिरिक्तपदभार सोपविण्यात आला त्या अधिकाºयाकडे अगोदरच त्याच्या स्वत:सह अन्य उपअभियंत्याचाही पदभार यापूर्वीच देण्यात आलेला आहे. असे असतानाही पुन्हा तिसºया पदाचा भार टाकून कनिष्ठ अभियंत्याचा जिल्हा परिषदेने छळ चालविल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

The Executive Engineer is in charge of the Junior Engineer | कार्यकारी अभियंत्याचा पदभार कनिष्ठ अभियंत्याकडे

कार्यकारी अभियंत्याचा पदभार कनिष्ठ अभियंत्याकडे

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा परिषदेत चमत्कार लघुपाटबंधारे खात्यात प्रकार

नाशिक : जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागात कार्यकारी अभियंता रजेवर गेल्यानंतर त्यांच्याशी समकक्ष असलेल्या अधिकाऱ्याकडे अतिरिक्तपदभार देणे गरजेचे असताना चक्क कनिष्ठ अभियंत्याकडे (ज्युनिअर) पदभार देण्याचा प्रकार घडला असून, विशेष म्हणजे ज्या अधिकाºयाकडे अतिरिक्तपदभार सोपविण्यात आला त्या अधिकाºयाकडे अगोदरच त्याच्या स्वत:सह अन्य उपअभियंत्याचाही पदभार यापूर्वीच देण्यात आलेला आहे. असे असतानाही पुन्हा तिसºया पदाचा भार टाकून कनिष्ठ अभियंत्याचा जिल्हा परिषदेने छळ चालविल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या जलसंधारण खात्याच्या पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण गायकवाड यांच्या घरी धार्मिक कार्यक्रम असल्याने गेल्या वीस दिवसांपासून ते रजेवर गेले आहेत. त्यांच्या गैरहजेरीत जलसंधारण विभागाचे कामकाजावर परिणाम होऊ नये यासाठी त्यांच्याशी समकक्ष अन्य ज्येष्ठ व अनुभवी अधिकाºयाकडे त्यांचा पदभार सोपविणे क्रमप्राप्त असताना जिल्हा परिषदेने नाशिक पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंता डी. ए. अहिरे यांच्याकडे थेट कार्यकारी अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार सोपविला आहे.
अगोदरच दोन पदांचा भार ते वाहत असताना पुन्हा कार्यकारी अभियंत्यासारखे जबाबदारीचे पद त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. विशेष म्हणजे जलसंधारणच्या पश्चिम विभागात बहुतांशी आदिवासी तालुके असून, आर्थिक वर्षाचा अखेरचा महिना म्हणून मार्च महिन्यात प्रत्येक विभागात कामांची तसेच देयके अदा करण्याची धावपळ उडालेली असताना कनिष्ठ अभियंत्यांकडे एकापेक्षा अधिक पदभार सोपविण्याची कृती कोड्यात टाकणारी ठरली आहे.
दोन पदांचा कार्यभार एकाकडेच
विशेष म्हणजे याच जलसंधारण खात्याच्या पश्चिम विभागात गायकवाड यांच्याशी समकक्ष असलेले कार्यकारी अभियंता मनोज खैरनार हे कार्यरत असताना त्यांच्याकडे पदभार न देता थेट नाशिक पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंत्यांकडे पदभार सोपविण्यात आला आहे. कनिष्ठ अभियंता अहिरे यांच्याकडे यापूर्वीच त्यांचा स्वत:चा पदभार तर आहेच, परंतु नाशिक पंचायत समितीचे उपकार्यकारी अभियंत्यांचे पदही रिक्त असल्याने त्या पदाचाही अतिरिक्त कारभार अहिरे हेच सांभाळत आहेत.

Web Title: The Executive Engineer is in charge of the Junior Engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.