कार्यकारी अभियंत्याला डांबले; पाणीपुरवठा योजनेचा वाद उपाध्यक्षांची शिष्टाई : आंदोलनकर्त्यांचा केदा अहेर, राहुल अहेर यांच्यावर आरोप
By admin | Published: February 5, 2015 10:40 PM2015-02-05T22:40:50+5:302015-02-05T22:41:28+5:30
कार्यकारी अभियंत्याला डांबले; पाणीपुरवठा योजनेचा वाद उपाध्यक्षांची शिष्टाई : आंदोलनकर्त्यांचा केदा अहेर, राहुल अहेर यांच्यावर आरोप
नाशिक : देवळा शहरासाठी राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे काम कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर व आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या सांगण्यावरून बंद केल्याच्या कारणावरून काल (दि.५) सायंकाळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांना देवळ्याच्या एका शिष्टमंडळाने त्यांच्या कार्यालयात डांबले. घटनेची माहिती मिळताच उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीत प्रकाश नंदनवरे यांच्या कक्षात धाव घेऊन देवळ्याच्या शिष्टमंडळाची चर्चा करून हे आंदोलन थांबविले. देवळा येथील सुमारे साडेचार कोटींच्या खर्चाची पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून, ते काम निकृष्ट होत असल्याचे कारण देत जिल्हा परिषद सभापती केदा अहेर व आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या सांगण्यावरून जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांनी थांबविल्याचा आरोप करीत देवळ्याचे शिवसंग्राम संघटनेचे उदयकुमार अहेर यांच्यासह एका शिष्टमंडळाने काल गुरुवारी सायंकाळी जिल्हा परिषदेत धाव घेऊन प्रकाश नंदनवरे यांच्या कक्षात जाऊन नंदनवरे यांना या पाणीपुरवठा योजनेचे काम तत्काळ सुरू करावे अन्यथा आम्ही येथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी प्रकाश नंदनवरे यांच्या कक्षात धाव घेऊन हे काम जिल्हा परिषद नव्हे, तर पाणीपुरवठा समिती करीत असून, त्यांनाच ते सुरू व बंद करण्याचा अधिकार आहे. तथापि, या प्रश्नावर ७ फेब्रुवारीला आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या उपस्थितीत बैठक बोलविण्यात आली असून, त्यात ही योजना सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांची त्यांच्या कक्षातून सुटका केल्याचे समजते. (प्रतिनिधी) इन्फो.. रखडलेल्या योजनांची मागविली माहिती या आंदोलनाची माहिती मिळताच अध्यक्ष विजयश्री रत्नाकर चुंबळे यांनी प्रकाश नंदनवरे यांच्याशी चर्चा करीत या योजनेबाबत आवश्यक त्या सूचना पाणीपुरवठा समितीला देण्याबाबत आदेश दिले. तसेच जिल्'ातील किती योजना दोन, तीन व पाच वर्षांपासून रखडलेल्या आहेत, त्यांची तत्काळ माहिती देण्याचे आदेश चुंबळे यांनी दिले आहेत. याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. फोटो कॅप्शन- ०५ पीएचएफबी-९८- आंदोेलनकर्त्यांशी चर्चा करताना जि. प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे.