१३ हजाराहून अधिक शेतकऱ्यांची भारनियमनातून मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 01:57 PM2020-10-09T13:57:07+5:302020-10-09T13:57:43+5:30

सिन्नर: सिन्नरच्या पूवर्भागातील चार वीजउपकेंद्रावरील १३ हजाराहून अधिक शेतकऱ्यांची साडेतीन वर्षांनंतर अतिरिक्त भारनियमनातून मुक्तता झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला.

Exemption of more than 13,000 farmers from weight regulation | १३ हजाराहून अधिक शेतकऱ्यांची भारनियमनातून मुक्तता

१३ हजाराहून अधिक शेतकऱ्यांची भारनियमनातून मुक्तता

Next

सिन्नर: सिन्नरच्या पूवर्भागातील चार वीजउपकेंद्रावरील १३ हजाराहून अधिक शेतकऱ्यांची साडेतीन वर्षांनंतर अतिरिक्त भारनियमनातून मुक्तता झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला.
शहा, देवपूर, वडांगळी, सोमठाणे व निमगाव सिन्नर असे ५ वीजउपकेंद्र मुसळगाव वीजकेंद्रातून एकाच उच्चदाब वाहिनीने जोडली होती. नंतर निमगाव -सिन्नर दुस?्या वाहिनीला जोडण्यात आले. मात्र तरीही उर्वरित चार उपकेंद्रांना ही वाहिनी पुरेशा क्षमतेने वीजपुरवठा करू शकत नव्हती. त्यामुळे गेल्या साडेतीन वर्षांपासून या वाहिनीवरील ओव्हरहेड तारा बदलविण्याची मागणी होत होती. आठ महिन्यांपूर्वी आमदार माणिकराव कोकाटे यांनी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता दारोली, कायर्कारी अभियंता मनीष ठाकरे व उपअभियंता खैरनार यांच्याशी बैठक घेऊन यावर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. कोकाटे यांनी जिल्हावार्षिक योजनेतून या कामासाठी ७८ लाख रुपये निधी मंजूर करून आणत हे काम मार्र्गी लावले.देवपूर व शहा वीजउपकेंद्र नवीन वाहिनीवर जोडण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य सीमंतीनी कोकाटे यांच्या हस्ते मुसळगाव सबस्टेशनवर कळ दाबून नवीन वीजवाहिन्या प्रवाहित करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी स्टाईसचे चेअरमन पंडितराव लोंढे, उपकायर्कारी अभियंता ऋषीकेश खैरनार,वैभव पवार व हर्षल मांडगे, संभाजी जाधव,सोपान वाईकर,राजू कोकाटे आदींसह जनमित्र उपस्थित होते.

Web Title: Exemption of more than 13,000 farmers from weight regulation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक