डोक्यावर पाणी आणून भात रोपे जगविण्यासाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 12:51 PM2020-07-15T12:51:10+5:302020-07-15T12:51:52+5:30

पेठ - पावसाचे माहेरघर असलेल्या पेठ तालुक्यात या वर्षी पावसाने दडी मारल्याने भातासह नागलीची लावणी रखडली असून रोपे तयार असली तरी पाऊस नसल्याने लावणी करता येत नाही. शिवाय शेतकऱ्यांना डोक्यावर पाणी आणून रोपे जगवण्याची वेळ आली आहे.

Exercise to keep the rice seedlings alive by bringing water to the head | डोक्यावर पाणी आणून भात रोपे जगविण्यासाठी कसरत

डोक्यावर पाणी आणून भात रोपे जगविण्यासाठी कसरत

Next

पेठ - पावसाचे माहेरघर असलेल्या पेठ तालुक्यात या वर्षी पावसाने दडी मारल्याने भातासह नागलीची लावणी रखडली असून रोपे तयार असली तरी पाऊस नसल्याने लावणी करता येत नाही. शिवाय शेतकऱ्यांना डोक्यावर पाणी आणून रोपे जगवण्याची वेळ आली आहे.
साधारण जूलै महिन्याच्या मध्यावर दरवर्षी भाताची लावणी पूर्ण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यानुसार याही वर्षी नियोजन केले मात्र पाऊस लांबल्याने रोपे तयार असली तरी लावणीसाठी शेतात पाणी साचले नसल्याने शेतकर्यांना इकडून तिकडून पाणी आणून लावणी करावी लागत आहे. डोंगर उतारावर असलेले नागलीची रोपे करपू लागली आहेत. रोपे वाचवण्यासाठी डोक्यावर हंडयाव्दारे पाणी आणून शेतकरी धडपड करत आहेत. अजून काही दिवस पावसाने दडी दिल्यास पेठ तालुक्यातील शेतकºयांचा खरीप हंगाम वाया जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
--------------------
कृषी विभागाच्या या वर्षी पेठ तालुक्यातील शेतकर्यांना आधूनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून अद्ययावत भात रोपवाटिका विकिसत करण्यात आल्या आहेत. मात्र पावसाने ओढ दिल्याने भाताची आवणी लांबणीवर पडल्यास त्याचा उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून कृषी विभागाच्या वतीने शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. ज्यांना जलसिंचनाची सुविधा आहे. त्या शेतकºयांनी भाताची लावणी सुरू करावी.
-अरविंद पगारे, तालुका कृषी अधिकारी पेठ
----------------------------------
दरवर्षी आषाढी एकादशीला भाताची लावणी करून शेतकरी वारीला जात होते. या वर्षी वारी बंद असूनही पावसामुळे भाताची लावणी करता येत नाही. शेतात भात, नागाली सह फळझाडांची रोपे तयार झाली आहेत. रोपांची अधिक वाढ झाल्यास उत्पन्नात घट होते. त्यामूळे शेतकरी अडचणीत सापडण्याची चिन्हे दिसत आहेत.
-रतन महाले,शेतकरी, पेठ

Web Title: Exercise to keep the rice seedlings alive by bringing water to the head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक