महापारेषण कंपनीने थकविली घरपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:11 AM2021-07-10T04:11:26+5:302021-07-10T04:11:26+5:30

कसबे सुकेणे : येथील निसाका रस्त्यावर असलेल्या महापारेषण कंपनीच्या १३२ केव्ही अतिउच्चदाब वीज केंद्राने कसबे सुकेणे ग्रामपालिकेची २२ लाख ...

Exhausted house rent by Mahatrans Company | महापारेषण कंपनीने थकविली घरपट्टी

महापारेषण कंपनीने थकविली घरपट्टी

Next

कसबे सुकेणे : येथील निसाका रस्त्यावर असलेल्या महापारेषण कंपनीच्या १३२ केव्ही अतिउच्चदाब वीज केंद्राने कसबे सुकेणे ग्रामपालिकेची २२ लाख ३८ हजार १३० रुपयांची घरपट्टी थकविल्याने ग्रामपालिकेने सदरची थकबाकी रक्कम त्वरित भरण्याची नोटीस दिली आहे . कसबे सुकेणे येथील दगड खाण भागात महापारेषण कंपनीचे १३२ केव्ही अतिउच्च दाब केंद्र आहे, या केंद्राकडे सन २०१४-१५ पासून ते २०२१-२२ पर्यंत कसबे सुकेणे ग्रामपालिकेची ३३ लाख ७४ हजार ५०६ घरपट्टी झाली आहे. यातील ११ लाख ३६ हजार १३० रुपये कंपनीने ग्रामपालिकेकडे भरलेले आहे. त्यामुळे उर्वरित २२ लाख ३८ हजार ३७६ रुपयांच्या थकीत घरपट्टीसाठी आता कसबे सुकेणे ग्रामपालिकेने महापारेषणला वसुलीचा तगादा लावला आहे. सदरची घरपट्टी त्वरित न भरल्यास कायदेशीर कार्यवाही करु, असे ग्रामपालिकेने सहाय्यक अभियंता यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

वीज बिल न भरल्याने कसबे सुकेणे शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा गेल्या काही दिवसांपासून महावितरणने बंद केला आहे, त्यामुळे आता ग्रामपालिकेने वीज कंपनी व महापारेषणसह इतर थकबाकीदारांना थकीत घरपट्टी भरण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत.

महापारेषण व वीज कंपनीच्या सुकेणेतील कार्यालयाकडे लाखोंची थकबाकी आहे, ही रक्कम मिळाल्यास पथदिव्यांचे वीज देयक भरता येईल- धनंजय भंडारे, उपसरपंच , कसबे सुकेणे

योगेश सगर कसबे सुकेणे

Web Title: Exhausted house rent by Mahatrans Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.