कसरती क्रीडा प्रकारांचे प्रदर्शन, ‘नाशिक महापौर जिमनॅस्टिक चषक स्पर्धांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 09:26 PM2018-02-10T21:26:41+5:302018-02-10T21:34:36+5:30

जिमनॅस्टि क्रीडा प्रकारांतील सर्व खेळांविषयी जागृती निर्माण होऊन नाशिकमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिमनॅस्टीस्ट घडावे यासाठी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आयोजित जिमनॅस्टिक स्पर्धाच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी (दि.10)शहरातून शोभायात्र काढण्यात आली.

Exhibition of the Athletic Games, 'Nashik Mayor Gymnastic Trophy Opening Inauguration | कसरती क्रीडा प्रकारांचे प्रदर्शन, ‘नाशिक महापौर जिमनॅस्टिक चषक स्पर्धांचे उद्घाटन

कसरती क्रीडा प्रकारांचे प्रदर्शन, ‘नाशिक महापौर जिमनॅस्टिक चषक स्पर्धांचे उद्घाटन

Next
ठळक मुद्देशोभायात्रेतून कसरती क्रीडा प्रकारांचे प्रदर्शनराज्यभरातील जिमनॅस्ट खेळाडुंचा सहभागढोल पथकाच्या तालावर लेझिम पथकाचा ठेका

नाशिक : क्रीकेट, हॉकी, टेनीस फुटबॉल, कुस्ती, कब्बडी, खो खो सारख्या स्पर्धाप्रमाणोच जिमनॅस्टि क्रीडा प्रकारांतील सर्व खेळांविषयी जागृती निर्माण होऊन नाशिकमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिमनॅस्टीस्ट घडावे यासाठी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आयोजित जिमनॅस्टिक स्पर्धाच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी (दि.10)शहरातून शोभायात्र काढण्यात आली.
महानगरपालिका व नाशिक जिल्हा जिमनास्टिक असोसिएशनतर्फे ह्यनाशिक महापौर जिमनॅस्टिक चषक राज्य अजिंक्यपदह्ण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी छत्रपती शिवाजी स्टेडीयमपासून शोभायात्र काढून विविध जिमनॅस्टिक क्रीडा प्रकारांविषयी जनजागृती व प्रचार, प्रसार करण्यात आला. याप्रसंगी महापौर रंजना भानसी, नाशिक जिल्हा जिमनास्टिक असोसिएशनचे अध्यक्ष शाहू खैरे, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, उपाध्यक्ष भालचंद्र भट, सचिव राकेश केदारे, सहसचिव कुमार शिरवाडकर, श्रीराज काळे, किरण कवीश्वर, क्र ीडा अधिकारी एम.डी.पगारे, नगरसचिव राजु कुटे आदि आदि उपस्थित होते. या शोभा यात्रेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी क्रीडा रथांवर स्वार होत वेगवेगळे जिमनॅस्टिक क्रीडा प्रकारांचे सादरीकरण करीत नाशिककरांची मने जिंकून घेतली. राज्यभरातून आलेल्या जिमनास्टिकच्या संघानीही या शोभायात्रेत सहभाग नोंदवला. ढोलपथकांच्या गजरात लेझीम पथकांसह जिमनास्टिकचे खेळाडू महानगरपालिकेच्या व अन्य खासगी संस्थांच्या शाळांच्या सुमारे एक हजार विद्याथ्र्यानी रोप, मल्लखांब, कराटे, योगासने आदि विविध क्रीडा प्रकारांचे शोभायात्रेत सादरीकरण केले. या शोभायात्रेचा अशोकस्तंभ,रविवार कारंजा,मेनरोड,शालीमारमार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर आल्यानंतर शोभायात्रेचा समारोप झाला.

उद्घाटन सोहळ्य़ात रंगत
शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर शुक्रवारपासून सुरू असलेल्या नाशिक महापौर जिमनॅस्टिक चषक राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे शनिवारी (दि.10 )सायंकाळी आमदार बाळासाहेब सानप व देवयानी फरांदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून औपचारीक उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस खात्याच्या बँड पथकाने तालबद्ध वादनाने उपस्थितांचे स्वागत करून स्पर्धेत सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन दिले. तर नृत्यांगणच्या शिष्यांनी कथकनृत्याचे सादरीकरण करून खेळाडुंचा उत्साह वाढविला. त्याचप्रमाणो वेगवेगळ्य़ा योगासनांच्या सादरीकरणानेही या उद्घाटन सोहळ्य़ात चांगलीच रंगत भरली.यावेळी नगरसेवक गजानन शेलार, वत्सला खैरे, दिनकर पाटील, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, विलास शिंदे, शीतल माळोदे, सुदाम डेमसे यासह महापालिकेतील विविध पक्षाचे नगरसेवकांची उपस्थिती होती.

Web Title: Exhibition of the Athletic Games, 'Nashik Mayor Gymnastic Trophy Opening Inauguration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.