डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:48 AM2020-02-16T01:48:49+5:302020-02-16T01:49:13+5:30
घोटी ग्रामपालिका, राज्य सरकारचा पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने आयोजित संकरित व डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचा शनिवारी समारोप झाला. खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते प्रदर्शनात विविध प्रकारात उत्तम ठरलेल्या जनावरांच्या मालकांचा रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
नांदूरवैद्य : घोटी ग्रामपालिका, राज्य सरकारचा पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने आयोजित संकरित व डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचा शनिवारी समारोप झाला. खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते प्रदर्शनात विविध प्रकारात उत्तम ठरलेल्या जनावरांच्या मालकांचा रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
समारोपास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय शिरसाठ, माजी आमदार रु पेश म्हात्रे, आमदार हिरामण खोसकर उपस्थित होते. प्रदर्शनामध्ये चॅम्पियन वळूचे मालक धामणी येथील राजाराम भीमा घोटे यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
पारितोषिक वितरणप्रसंगी आमदार सरोज आहिरे, किरण लहामते, जि.प. चे कृषी, पशुसंवर्धन सभापती संजय बनकर, सभापती जया कचरे, माजी आमदार शिवराम झोले, काशीनाथ मेंगाळ, वैभव पिचड, शिवसेना जिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, ज्येष्ठ नेते गणपतराव कडू, घोटीचे सरपंच मनोहर घोडे, उपसरपंच संजय आरोटे, ग्रामपालिका सदस्य रामदास भोर, रवींद्र तायडे, अर्चना घाणे, अरु णा जाधव, वैशाली गोसावी, सुनंदा घोटकर, सुनीता घोटकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रदर्शनातील निकाल याप्रमाणे
डांगी वळू - धोंडिबा किसन बिन्नर (केळी, ता.अकोले), (दोन दात)- विठ्ठल सोमा गंभीरे. (गंभीरवाडी, ता. अकोले), (चार दात)- नवनाथ विठोबा तुपे (बेलू, ता. सिन्नर), (सहा दात) - राजाराम भीमा घोटे (धामणी, ता. इगतपुरी).
* डांगी जुळलेले- चंद्रकांत सखाराम बेंडकोळी. (काकनवाडी, ता. अकोले), डांगी वळू - भिका भवानी मेदडे (मोडाळे, ता. इगतपुरी), डांगी कालवड- भाऊसाहेब कचरू भोसले (धामणी, ता. इगतपुरी), ज्ञानदेव विठोबा कासार (शेरणखेड, ता. अकोले) डांगी गाभण गाय- अंकुश गोरख भोसले (धामणी, ता. इगतपुरी), दुभती गाय- दत्तू तुकाराम कोकण े(शेरणखेड, ता. अकोले).
खिल्लार- सुधाकर चंदर आडोळे (बोरटेंबे, ता. इगतपुरी), दोन दात- रामेश्वर बाजीराव डांगळे (नांदूरमधमेश्वर, ता. निफाड.), चार दात- झिप्पर गणपत आडोळे (बोरटेंबे, ता. इगतपुरी), सहा दात- गोटीराम भगवान चव्हाण (माणिकखांब, ता. इगतपुरी), खिल्लार बैलजोडी- कारभारी मल्हारी सदगीर (डुबेरवाडी, ता. सिन्नर), संकरित कालवड- सिद्धार्थ पांडुरंग भोर (टाके,घोटी).