निर्यातक्षम द्राक्षबागांच्या नोेंदणीचे आवाहन
By admin | Published: October 9, 2014 01:06 AM2014-10-09T01:06:35+5:302014-10-09T01:10:02+5:30
निर्यातक्षम द्राक्षबागांच्या नोेंदणीचे आवाहन
नाशिक : युरोपीयन देशांमध्ये निर्यात करू इच्छिणाऱ्या द्राक्ष बागायतदारांनी त्यांच्या द्राक्षबागेची नोेंदणी व मागील वर्षी नोंदणी करण्यात आलेल्या द्राक्षबागांचे नूतनीकरण करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०१४ पर्यंत असून, द्राक्ष उत्पादकांनी विहित प्रपत्रात अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मधुकर पन्हाळे यांनी केले आहे.
निर्यातक्षम द्राक्षबागेची नोेंदणी/नूतनीकरण करण्याकरिता अर्जदाराने सुधारित प्रपत्र-१ अर्ज व ५० रुपये प्रतिनोंदणी करावयाची बाग याप्रमाणे शासकीय चलनाद्वारे फी कोषागारात भरून विहित मुदतीत अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करावयाचे आहेत. अर्जासोबत बागेचा नकाशा व गाव नमुना सातबाराची प्रत व नवीन बागेची नोंदणीकरिता संबंधित कार्यक्षेत्रातील कृषी विभागाचे तपासणी अधिकारी यांची विहित प्रपत्र ४ अ मधील तपासणी प्रपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.(प्रतिनिधी)
सन २०१४-१५ मध्ये निर्यातक्षम उत्पादन घेणाऱ्या सर्व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्षबागांची नोेंदणी विहित मुदतीपूर्वी करून घ्यावी व ऐनवेळी होणारी धावपळ टाळावी, असे आवाहन मधुकर पन्हाळे यांनी केले आहे.(प्रतिनिधी)