देहविक्रीचा व्यवसाय उघड : सात महिलांसह १५ जण ताब्यात; गुन्हे शाखेची कारवाई
By admin | Published: May 28, 2015 11:52 PM2015-05-28T23:52:52+5:302015-05-29T00:04:52+5:30
हॉटेल कुणालवर पोलिसांचा छापा
पंचवटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल कुणाल येथे देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याबाबत सांगली येथील सिस्टर फ्रिडम प्रोजेक्ट या संस्थेने केलेल्या तक्रारीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमाराला हॉटेल कुणालवर छापा टाकून सात महिलांसह पंधरा संशयिताना ताब्यात घेतले आहे.
हॉटेल कुणाल येथे कुंटणखाना चालविला जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमाराला गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेल परिसरात सापळा रचून तसेच बनावट ग्राहक पाठवून या कुंटणखान्यावर छापा टाकला. पोलिसांनी या ठिकाणाहून ४८ हजार रुपयांची रोकड तसेच जवळपास ४० निरोधची पाकिटे जप्त केली आहे. याबाबत माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील मिरज येथे सिस्टर फ्रिडम प्रोजेक्ट ही संस्था कार्यरत असून, या संस्थेच्या सदस्यांनी तक्रार केली होती. हॉटेल कुणाल येथे मुस्तफा शेख हा पीडित महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी हॉटेलात छापा टाकला असता हॉटेलातील विविध खोल्यांमध्ये काही महिला व ग्राहक आढळले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे रोक रक्कम मिळाली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून कारवाई सुरू होती. पोलिसांनी या हॉटेलातून महिलांना देहविक्री करायला लावणारा संशयित मुस्तफा शेख याच्यासह बापू बाबूराव नवले, शांताराम विठोबा घुले, बाळासाहेब राजाराम जाधव, (चांदवड), वैभव जगन्नाथ मुरकुटे (लामखेडे मळा, दिंडोरीरोड), कल्पेश अनिल पाटील, (विडी कामगारनगर), शांताराम रामनाथ झाडे (अमृतधाम), मुस्तफा शेख यांचा मदतनीस रंजन विश्वंभर बराई, (पश्चिम बंगाल) अशा संशयितांसह देहविक्री करत असल्याच्या संशयावरून सात महिलांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या महिला मुंबई, वाशी, ठाणे, तसेच पुणे जिल्ह्यातील आहेत. (वार्ताहर)