करंजाळी-हरसूल रस्त्याचा वनवास संपणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 23:40 IST2021-11-28T23:38:16+5:302021-11-28T23:40:05+5:30

करंजाळी : गत अनेक वर्षांपासून करंजाळी ते हरसूल या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्याची झालेली दुरवस्था आता संपणार असून, जवळपास आठ कोटी अनुदान मंजूर झाले असून ठेकेदारांने मजबूत काम करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. गत अनेक दिवसांपासून रखडलेल्या या रस्ता कामाचे भूमिपूजन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते संपन्न झाले.

Exile of Karanjali-Harsul road will end! | करंजाळी-हरसूल रस्त्याचा वनवास संपणार !

करंजाळी ते हरसूल रस्ता कामाच्या भूमिपूजनप्रसंगी नरहरी झिरवाळ, भास्कर गावित, विलास अलबाड, दामू राऊत, गिरीश गावित आदी.

ठळक मुद्देआठ कोटींच्या कामाचे भूमिपूजन

करंजाळी : गत अनेक वर्षांपासून करंजाळी ते हरसूल या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्याची झालेली दुरवस्था आता संपणार असून, जवळपास आठ कोटी अनुदान मंजूर झाले असून ठेकेदारांने मजबूत काम करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
गत अनेक दिवसांपासून रखडलेल्या या रस्ता कामाचे भूमिपूजन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते संपन्न झाले. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात येणार असून, यामुळे पेठ व त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यांतील दळणवळणाची सोय होणार आहे. यावेळी जि. प. सदस्य भास्कर गावित, सभापती विलास अलबाड, दामू राऊत, गिरीश गावित, विठोबा भोये, गोकूळ झिरवाळ, अंबादास चौरे, मनोहर चौधरी, रामदास गवळी, पूनम गवळी, तहसीलदार संदीप भोसले, गटविकास अधिकारी श्रीकिसन खताळे यांच्यासह तालुक्यातील सरपंच, चेअरमन व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Web Title: Exile of Karanjali-Harsul road will end!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.