रामशेजसह जिल्ह्यातील दुर्गांचे अस्तित्वच धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 03:08 PM2020-10-27T15:08:11+5:302020-10-27T15:10:10+5:30
जानोरी : किल्ले अजिंक्य रामशेजवर शनिवारी,रविवारी हजारो पर्यटकांची गर्दी असते. या पर्यटकांना सुरक्षितपणे किल्ला बघण्यासाठी कुठलीही यंत्रणा नसल्याने किल्ल्यावर काही टवाळ व उपद्रवीकडून किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तुना धोका निर्माण होत आहे. पर्यटकांना डोकेदुखी असलेला किल्ल्यावर टवाळांचा कायमच असणारा हैदोस थांबवावा याबाबत रामशेजवरील ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षणासाठी तातडीने उपाय योजावे अशी मागणी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे, सहाय्यक वनसंरक्षक संजय मोरे व पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक आरती आळे, आशेवाडी ग्रामपंचायत कार्यालय यांना देण्यात आले आहे.

किल्ले रामशेज नाशिकपासून अवघा १२ किलोमीटरवर पेठरोड लगत हा दुर्ग आहे. अवघ्या ३३० मावळ्यांनी ६ वर्षे रामशेजला वेढा देऊन बसलेल्या हजारो मुघली फौजेची दाणादाण उडवून रामशेज अजिंक्य राखला होता. याच पराक्रमाचे प्रतीक असलेला दुर्ग रामशेज अत्यंत महत्वाचा मूर्तिमंत वारसा आहे.
किल्ल्यावरील दिवसागणिक वाढती गर्दी बघता किल्ल्यावर सुरक्षित पर्यटन व्हावे यासाठी अधिकृत गाईड नाही. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटन पोलीस ही किल्ल्यावर नसतात, त्यामुळं असुरक्षित पर्यटकांना टवाळ मंडळींकडून त्रास होतो.
किल्ल्यावर जाणाऱ्या येणाऱ्यांची नोंदणी केली जात नाही. रामशेजवर कायमचा बंधुकंधारी वनपाल नेमावा, किल्ल्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंदणीसाठी वन विभागाने पायथ्याला चौकी उभारावी अश्या अनेक मागण्यांचे निवेदन शिवकार्य गडकोट संस्थेच्या वतीने संबंधितांना दिलेली आहे.
दुर्ग रामशेजच्या तग धरून उरलेल्या वास्तू त्या किल्ल्याचे वैभव आहे. बागलाणचा ग्रीब्ज या इंग्रज अधिकाऱ्याने जिल्ह्यातील दुर्ग १८१८ नंतर सुरुंग लावून उध्वस्त केले. रामशेज ही त्यात उध्वस्त केला गेला. उरलेल्या वास्तू कित्येक दिवस दुर्लक्षित भग्न आहेत. प्रभू रामाची शेज असलेला रामशेज जीवापाड जपणारी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या अपार कष्टाने रामशेजसह जिल्ह्यातील कित्येक दुर्ग आज तग धरून आहेत. हातगडसाठी आमच्या पूर्वजांनी बलिदान दिले, मात्र त्यांच्या समाध्यांची स्थिती स्थानिकांच्या दुर्लक्षामुळे दुरवस्थेत आहे. हे दुर्ग वाचवणे सर्वांचेच कर्तव्य आहे. ते प्रत्येकाने केलं पाहिजे.
- मनोहर मोरे देशमुख (हतगडचे किल्लेदार गंगाजी मोरे देशमुख यांचे १३ वे वंशज)