अनावश्यक गर्दीवर पोलिसांकडून रस्ता बंदीचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 11:57 PM2021-05-06T23:57:32+5:302021-05-07T01:04:07+5:30

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहे. कडक निर्बंध शासनाने ...

Exit of road blockade by police on unnecessary crowds | अनावश्यक गर्दीवर पोलिसांकडून रस्ता बंदीचा उतारा

अनावश्यक गर्दीवर पोलिसांकडून रस्ता बंदीचा उतारा

Next
ठळक मुद्दे वाहतूक बंद : बोहरपट्टी-रामसेतू पुलाचा परिसरात वाहनांना मज्जाव

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहे. कडक निर्बंध शासनाने घातले असले तरीदेखील रविवार कारंजा ते थेट रामसेतू पुलापर्यंतच्या परिसरात दररोज सकाळी नागरिकांची गर्दी उसळत होती. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे या भागात वाहतूक कोंडी होऊन वर्दळ अधिकाधिक रेंगाळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी अधिसूचना काढत या भागात वाहनांना प्रवेशास मज्जाव केला आहे. तशी अधिसूचना काढली असून या अधिसूचनेची अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात आहे.
या नव्या उपाययोजनेमुळे या भागातील अनावश्यक गर्दी नियंत्रणात आणणे शक्य होत असल्याचे चित्र गुरुवारी (दि. ६) पाहावयास मिळाले. मात्र ह्यसोशल डिस्टन्सह्ण यावेळी राखला जात नसल्याचे दिसून येते. शासनाने भाजीपाला, किराणा माल, दूध, दुग्धजन्य पदार्थ विक्रीला जीवनावश्यक म्हणून परवानगी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत देण्यात आली आहे. या कालावधीत अन्य कुठल्याही प्रकारच्या दुकानांना व्यवसाय करण्यास परवानगी नसल्याचे शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे सकाळी ७ ते ११ या वेळेत भाजी व किराणा खरेदीसाठी उडणारी झुंबड चिंता वाढविणारी आहे. ग्राहकांना दुकानांपर्यंत वाहने नेण्यास मज्जाव केल्यास सुरक्षित वावर राखता येईल या उद्देशाने पोलिसांनी बाजारपेठेतील रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. पुढील ११ दिवस रविवार कारंजा भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी बुधवारी सकाळपासून सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी ग्राहकांना नव्या निर्बंधांची माहिती नसल्याने गोंधळ उडाला. अनेक जण दुचाकी, चारचाकीसह बाजारपेठेत प्रवेश करत होते. यामुळे वाहतूक कोंडी झाली; मात्र गुरुवारी बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याने वाहनांची कोंडी झाली नाही. दरम्यान, भद्रकाली, तेलीगल्ली, दूध बाजार या ठिकाणी मात्र वाहतूक सुरूच राहत असल्याने गर्दी आणि वाहतूक कोंडी सकाळी होत आहे.

या मार्गांवर वाहनांना ह्यनो एन्ट्रीह्ण
-रविवार कारंजा-बोहरपट्टी कॉर्नर-सोन्या मारुती चौक-सराफ बाजार, भांडी बाजार-रामसेतू पुलापर्यंतचा परिसर (वेळ: सकाळी ७ ते ११)
- रविवार कारंजामार्गे गोरेराम गल्लीतून सराफ बाजाराकडे जाणारा रस्ता वाहनांसाठी दररोज सकाळी चार तास बंद


वाहतुकीचा पर्यायी मार्ग असा...
भद्रकाली सारस्वत नाल्यापासून दहीपूल साक्षी गणेश मंदिर रस्ता
- रविवार कारंजा- रेडक्रॉस सिग्नल- शालिमार- गंजमाळ सिग्नलमार्गे दूधबाजार, सारडा सर्कल
- सूर्यनारायण मंदिर- अहल्यादेवी होळकर पुलावरून थेट पंचवटी कारंजा- शनि गल्ली मार्गे गाडगे महाराज पुलावरून दहीपूल.

वाहन पार्किंगची व्यवस्था
- बोहरपट्टी कॉर्नर ते धुमाळ पॉइंट
- गोदावरी घाट व गाडगे महाराज पुलाखालील परिसर.

Web Title: Exit of road blockade by police on unnecessary crowds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.