धक्कादायक! गोदाघाटावरील परदेशी पक्षी होताहेत भटक्या कुत्र्यांचे भक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 12:56 PM2022-01-22T12:56:53+5:302022-01-22T12:57:07+5:30

टाकळीपासून एकलहरेपर्यंत गोदाकाठी मोर, घोरपड, मुंगूस, साप आदी पशुपक्षी मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. गंगावाडी आणि पंचकच्या दरम्यान बोराडे मळा ...

Exotic birds on Godaghata are eaten by stray dogs | धक्कादायक! गोदाघाटावरील परदेशी पक्षी होताहेत भटक्या कुत्र्यांचे भक्ष्य

धक्कादायक! गोदाघाटावरील परदेशी पक्षी होताहेत भटक्या कुत्र्यांचे भक्ष्य

Next

टाकळीपासून एकलहरेपर्यंत गोदाकाठी मोर, घोरपड, मुंगूस, साप आदी पशुपक्षी मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. गंगावाडी आणि पंचकच्या दरम्यान बोराडे मळा बेट आहे. त्याच्या बाजूला गोदावरी नदी वाहते. येथून जवळच महापालिकेचे मलशुध्दीकरण केंद्र आहे. निसर्गरम्य ठिकाण म्हणून या परिसराची ओळख झाली आहे. पहाटे पाच ते सकाळी आठ आणि सायंकाळी सहापर्यंत येथे शेकडोच्या संख्येने पक्षी येतात. ते पाहण्यासाठी पक्षीप्रेमी येतात. दोन वर्षांपासून परदेशी पक्ष्यांची संख्या वाढतच आहे.

काही पक्षी नांदूरमधमेश्वरहून येतात. नदीतील जलचरांना खाद्य केल्यानंतर पक्षी नदीकिनारी असतात. त्यावेळी काठावर लपलेली कुत्री त्यांचा फडशा पाडतात. पक्ष्यांचे मांस मिळू लागल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. ही कुत्री पक्षीप्रेमी, शेतकऱ्यांनाही तापदायक ठरत आहेत. काही शिकारी नदीत मासेमारी केल्यानंतर पक्ष्यांचीही शिकार करतात. परिसरातील मोरांची संख्याही शिकाऱ्यांमुळे कमी होऊ लागली आहे. त्यामुळे सर्व पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वनखाते, महापालिकेने भटकी कुत्री व शिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी रामचंद्र शिंदे, प्रदीप बोराडे, सुरेश बोराडे, तुकाराम बोराडे आदी शेतकऱ्यांनी वनखाते व महापालिकेकडे केली आहे. 

Web Title: Exotic birds on Godaghata are eaten by stray dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.