भाजपा शहराध्यक्षांना मुदतवाढीची बक्षिसी

By admin | Published: November 22, 2015 10:47 PM2015-11-22T22:47:20+5:302015-11-22T22:48:59+5:30

अनेकांचा मुखभंग : एक वर्ष मुदतवाढीची शक्यता

The expansion of the deadline for BJP city president | भाजपा शहराध्यक्षांना मुदतवाढीची बक्षिसी

भाजपा शहराध्यक्षांना मुदतवाढीची बक्षिसी

Next

नाशिक : भाजपाच्या स्थानिक शहराध्यक्षांनी आपल्या दोन टर्ममध्ये केलेल्या कामगिरीची दखल घेऊन विशेष बाब म्हणून त्यांना एक वर्ष मुदतवाढीची बक्षिसी देण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे संघटनात्मक निवडणुकीच्या निमित्ताने या पदासाठी आसुसलेल्या अनेकांचा मुखभंग होण्याची शक्यता आहे.
भाजपात अनेक पदांसाठी अनेक निकष लावले जातात. त्यात ज्येष्ठताक्रमही असतोच. त्यानुसार विद्यमान अध्यक्षांना एकदा संधी मिळाली. पाठोपाठ दुसऱ्यांदाही पक्षश्रेष्ठींनी संधी दिली. या कालावधीत पक्षाची पारंपरिक सेनेबरोबर असलेली युती तोडून महापालिका निवडणूक भाजपाचा स्वतंत्र बाणा त्यांनी दाखवला. स्वबळावर सत्ता येण्याचे भाजपाचे स्वप्न धुळीस मिळाले; परंतु कार्यकर्त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळाली. अल्पमतात असतानाही पक्षाने पारंपरिक मित्रपक्ष शिवसेनेला नाकारून मनसेबरोबर सत्तेत जाऊन फळे चाखण्याची संधी मिळाली. मृदू संभाषण आणि संघटन कौशल्यामुळे तर मोठ्या प्रमाणात अन्य पक्षांतील कार्यकर्ते भाजपाकडे आकर्षित झाले. त्यामुळे पक्षाला आता सर्वगुणसंपन्न कार्यकर्ते मिळाले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीतील कामकाज, त्यामुळे निवडणुकीत मिळालेले यश, तसेच पक्ष कार्यालयाला मिळालेले कार्पोरेट लूक त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला कुठल्याशी कंपनीत आल्याचा भास होत असून, कार्यालयीन शिस्तीमुळे कार्यकर्ते बोलवणे आल्याशिवाय अकारण कार्यालयात गर्दी करून थांबणे बंद झाले आहे. अशा अनेक मुद्द्यांचा विचार करून सध्या विद्यमान शहराध्यक्षांना पुढील महापालिका निवडणुकीपर्यंत मुदतवाढ देऊन विशेष बक्षिसी देण्याची तयारी सुरू आहे. सध्या पक्ष घटनेत संघटनात्मक निवडणुकीद्वारे केवळ दोन वेळाच अध्यक्ष होता येत असले, तरी शहराध्यक्षांना या नियमातून बाद होऊ न देता विशेष मुदतवाढ देण्याची तयारी सुरू आहे. अर्थातच पक्षातील अत्यंत कार्यक्षम आणि आमदारानेच हा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर मांडला असून, त्यामुळे तो शहराध्यक्षांची ‘दिगंत’ खाक्या बघता तो अमान्य होणारच नाही, असे पक्ष कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The expansion of the deadline for BJP city president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.